हत्तीच्या हल्यात मृत्यू झालेल्या माहूताच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत मिळवून दिली तात्काळ ५० हजांराची मदत* *उर्वरीत मदत तात्काळ देण्याच्या सूचना, मृतकाच्या परिवाराला पेंशन देण्याचे मागणी*




हत्तीच्या हल्यात मृत्यू झालेल्या माहूताच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत मिळवून दिली तात्काळ ५० हजांराची मदत
*उर्वरीत मदत तात्काळ देण्याच्या सूचना, मृतकाच्या परिवाराला पेंशन देण्याचे मागणी*
                 चवताळलेल्या हत्तीने जानीक मसराम या माहूताला ठार केल्याची दुर्दैवी घटना काल चंद्रपूरातील ताडोबा येथे घडली. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी वन अधिकारी यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन मृतक माहुताच्या कुटंबीयांची भेट घेतली. यावेळी मृतकच्या कुटुंबीयांना जोरगेवार यांनी तात्काळ ५० हजार रुपये मदत मिळऊन दिली. तसेच उदया ५० हजार रुपये मदत व शासनाकडून मिळणारी १५ लाख रुपयांची मदतीची प्रक्रिया जलत गतीने करण्यात यावी अश्या सुचना यावेळी जोरगेवार यांनी केल्यात तसेच मृतकाच्या कुटंबातील एका सदस्याला नौकरीमीळे पर्यंत कुटुंबाला पेशंन देण्यात यावे अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.

ताडोबा येथील गजराज या हत्तीने माहूताचा बळी घेतल्या नतंर गावतही भितीचे वातावरण पसरले आहे. आमदार किशोर जोरगेवार हे मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन चंद्रपूरात परतताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून मृतक माहूत जानीक मसराम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी वन अधिका-यांचीही उपस्थिती होती. जोरगेवार यांनी मृतकच्या नातलकांना धिर देत शक्य ती मदत मिळऊन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी तात्काळ ५० हजार रुपयांची मदत मिळवून दिली. तर उदया ५० हजारांचा धनादेश देण्याचे वन विभागाने मान्य केले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी शासनाच्या वतीने देण्यात येणारी १५ लाख रुपयांच्या मदतीची प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या सुचना वन विभागाला केल्यात तसेच वन विभागात मृतकाच्या कुटुंबीयांपैकी एकाला नौकरीमिळे पर्यंत कुटुंबीयांना उदरनिर्वाहाकरीता पेंशन देण्यात यावी अशी मागणी ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. सदर हत्ती चवताळलेला होता. या अगोदरही त्याने माहूतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामूळे वेळीच याची देखल घेतल्या गेली पाहिजे होती असेही जोरगेवार यावेळी बोलले,  या पुढे अश्या घटनांवर आळा घालण्याच्या दिशेने वन विभागाने उपाय योजना कराव्यात, माहुतांच्या सूरक्षेसाठी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, अश्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या