समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात दिरंगाई -ब्रिजभूषण पाझारे




समाजकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात दिरंगाई -ब्रिजभूषण पाझारे

  चंद्रपूर :
 जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. परंतु, योजना राबविण्यासाठी दिलेल्या मुदतीत उद्दिष्टांप्रमाणे कामे  होत नसल्याची स्पष्ट कबुली समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनीच दिली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त  केले  जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पाझारे समाजकल्याण विभागाच्या सभापतिपदाची धुरा सांभाळत असताना कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यापूर्वीच त्यांनी स्वत:च्याच विभागावर उपस्थित केलेल्या नाराजीची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. प्रत्येक विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी समाजकल्याण विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हा विभाग मागासवर्गीय प्रवर्गातील लोकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात अग्रेसर असतो. या विभागाला त्याप्रमाणात निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र, या विभागाचे सभापती आणि अधिकाèयांच्या समन्वय जुळून आल्यास अनेक योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातात. अन्यथा लाभाथ्र्यांच्या योजनांचा निधी अखर्चित राहून शासनाला परत करण्याची नामुष्कीसुद्धा अनेकदा ओढवली आहे. दरम्यान, अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आल्यानंतर समाजकल्याण सभापती म्हणून ब्रिजभूषण पाझारे यांच्याकडे भाजपाच्या नेत्यांनी धुरा सोपविली. पाझारे यांनी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जाऊन योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले. या विभागामार्फत अनेक नावीण्यपूर्ण कार्यक्रमही राबविण्यात आले. मात्र, ज्या योजना राबविण्यासाठी या विभागाची निर्मिती झाली आहे. त्याच योजना उद्दिष्टाप्रमाणे मुदतीत होत नसल्याचे समोर आले आहे.समाजकल्याण विभागाच्या योजना राबविण्यात दिरंगाई होत असल्यामुळे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी तालुकास्तरावर आढावा सभा आयोजित केले आहे. या अनुषंगाने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा व सन २०१९-२० या वर्षाचे नियोजन करण्याकरिता वरोरा पंचायत समितीच्या सभागृहात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आढावा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेनंतर काही गावांना भेटीसुद्धा देण्यात येणार आहेत. या आढावा सभेचे पत्र वरोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाèयांना देण्यात आले असून, त्या पत्रातच योजना मुदतीत राबविण्यात नसल्याबाबतची खंत सभापती पाझारे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पाझारे समाज कल्याण विभागाच्या सभापतिपदाची धुरा सांभाळत असताना कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यापूर्वीच त्यांनी स्वत:च्याच विभागावर उपस्थित केलेल्या नाराजीची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, शनिवारी वरोरा तालुक्याच्या आढावा सभेत पंचायत समितीचे पदाधिकरी, जि.प. सदस्य, ग्राम पंचायतींचे  सरपंच, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.वरोरा पंचायत समितीतील आढावा सभेत समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. या सभेनंतर वरोरा तालुक्यातील येन्सा, सालोरी, चरुर खटी, माढेळी, मेसा, नागरी, वंधली, चिनोरा, परसोडा या गावांना भेटी  दिल्या  जाणार आहे.