वसतिगृहात लैंगिक शोषण तिन कर्मचाऱ्यास 14 जणांवर गुन्हे दाखल


जिवती येथील विद्यार्थ्याने सेवादल वस्तीगृह चंद्रपूर या ठिकाणी प्रवेश घेतला होता. गेल्या दोन वर्षापासून मृतक विद्यार्थ्यावर येथील व्यवस्थापन व इतर कर्मचारी सहित जवळपास पंधरा ते वीस विद्यार्थी लैंगिक शोषण करत होते. बरेच दिवस हा घाणेरडा प्रकार सुरू होता याबाबत मृतक विद्यार्थ्याने संबंधित व्यवस्थापनाला सुद्धा कळवले होते परंतु शोषण करणाऱ्या व्यवस्थापनाने व कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले नाही त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण सुरू होते. ही बाब अत्यंत निंदनीय व गंभीर असून याबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजूभाऊ झोडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन केली.
सदर घटनेबाबत आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थ्याने आपल्याबाबत घडलेल्या घटनेचा सर्व तपशील एका नोटबुक मध्ये लिहून ठेवला आहे. या अनुषंगाने येथील व्यवस्थापन व मुलावर लैंगिक शोषण, हत्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोषींना तात्काळ अटक करावी व समाज कल्याण अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या अधिकार्‍यांवर सुद्धा तात्काळ कारवाई करावी तसेच सेवादल वसतिगृहाची सरकारी मान्यता रद्द करून वसतिगृह कायमस्वरूपी बंद करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी याबाबत तीव्र आंदोलन करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजूभाऊ झोडे यांनी प्रशासनाला दिला.
निवेदन देताना राजूभाऊ झोडे ,जयदिप खोब्रागडे ,डॉ राकेश गावतूरे,विनोद बरडे, धिरज तेलंग ,सुजाताताई भगत, प्रल्हाद काळे ,शोभाबाई वाघमारे, गणेश कांबळे ,सदिंप नरवाडे ,किसन कांबळे , रमेश ढेंगरे ,सतीश खोब्रागडे,धिरज बांबोडे, विनोद भड़के ,उमेश डाहाके आदि वचिंत बहुजन आघाडी च्ये कार्यकर्ता व संतप्त नागरिक उपस्थित होते.