सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड विद्यार्थ्यांच्या आयोजनातून फुलला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती



सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड विद्यार्थ्यांच्या आयोजनातून फुलला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती
  स्वराज्याला खऱ्या अर्थाने राजासारखे मन व रयतेच्या मनासारखा राजा प्रदान करणाऱ्या राजमाता म्हणजेच जिजाऊ माँसाहेब,तुमचा देश आणि देशबांधव यांची सेवा म्हणजेच देवसेवा असे सांगणारे म्हणजे स्वामी विवेकानंद या दोन्ही महान विभूतींचा जयंती समारोह  12 जानेवारी या दिवशी वर्ग सातवी वीच्या विद्यार्थी वर्गाने अतिशय योग्य पद्धतीने पार पडला..!!
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक *पानसे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहायक शिक्षिका आशा राजूरकर मॅडम,किरण गजपुरे मॅडम,सुरेखा कावळे मॅडम,रितू बघेले मॅडम,सहायक शिक्षक आशिष गोंडाने सर,पराग भानारकर सर,सतीश जीवतोडे सर,प्रणय दरवरे सर* यांची उपस्थिती होती..!!
*मुजरा माझा राजमाता जिजाऊंना*
  *दिले स्वराज्याला शिवछत्रपती*
*कैक वर्षाच्या पाशवी अत्याचाराला*
*माँसाहेब तुम्हीच दिली मूठमाती..*
    ह्या ओळी *कु.सुलक्ष्मी शेरकी* वर्ग 7 वा या सुत्रसंचालिकेने  सर्वांच्या पुढ्यात ठेवत राजमाता जिजाऊ यांचे त्यागमय जीवन सर्वांच्या समोर मांडले... 
   पाहुण्यांच्या स्थान ग्रहणानंतर *कु.भाग्यश्री कामडी व कु.भाग्यश्री  फटींग* या विद्यर्थिनींनी पाहुण्यांना औक्षण करीत मानाचे बिल्ले लावले.. आणि भारतीय संस्कृती ची ओळख यातून दिली...  यानंतर स्वागत गीत संचाने *"मन की विना से गुंजित ध्वनी मंगलम.. स्वागतम.. स्वागतम.."* या स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले.. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वर्ग 6 ची विद्यार्थिनी *कु.ईशीका फटाले* हिने केले... यानंतर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.. उपस्थित सर्व मान्यवरांनी  विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केलं..
   या कार्यक्रमाचे आभार वर्ग 7 विची विद्यर्थिनी कु.प्रणाली अगडे हिने मानले..या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष संजय गजपुरे यांनी शुभेच्छा दिल्या..!!