आदिवासी रेला नृत्य स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा व्येंकटापुर प्रथम पुरस्काराचे मानकरी



आदिवासी रेला नृत्य स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा व्येंकटापुर प्रथम पुरस्काराचे मानकरी   

 अहेरी :
                     अहेरी तालुक्यातील व्येंकटापुर येथिल शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उप पोलीस स्टेशन व्येंकटापुर व जिल्हा पोलीस प्रशासन गडचिरोलीचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आदिवासी रेला नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता.                                         सदर स्पर्धेत पोलीस स्टेशन व्येंकटापुर अंतर्गत येणाऱ्या आंबेझरा, लंकाचेन, कनैली, चिन्नावट्रा, पेदावटा, कोतागुडम, व्येंकटापुर वआवलमारी इत्यादी गावातील दहा संघानी सहभाग नोंदविला होता. मात्र या दहा संघातून शासकीय आश्रम शाळा व्येंकटापुर येथिल विद्यार्थ्यांनी आपल्या आदिवासी नृत्यांतून प्रेक्षकांची मने जिंकून अखेर मात्र शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सदर विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे रु. 3000 रोख पारितोषिक पोलीस दलातर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.           यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आवलमारी येथिल सरपंच सौ. सुनंदाबाई कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून आवलमारी चे पोलीस पाटील मनोहर पागडे, व्येंकटापुर चे पोलीस पाटील बाबुराव झाडे, कनैली चे पोलीस पाटील गंगाराम आत्राम, लंकाचेन चे पोलीस पाटील श्यामराव कुळमेथे, चिन्नावट्रा चे पोलीस पाटील बुधाची आत्राम, लोकमत चे प्रतिनिधी मुन्ना कांबळे, उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मिलिंद कुंभार, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.              आदिवासी रेला नृत्य स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा व्येंकटापुर च्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक वअभिनंदन केले जात आहे. सदर यशाचे श्रेय शाळेच्या महिला अधीक्षिका एस. एम. वाघमारे यांना जात असुन त्यांनी अथक परिश्रम घेवून विद्यार्थ्यांचा नियमित सराव घेवुन त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. नन्नेवार व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.