पडोली पो. स्टे. चे ठाणेदार योगेश हिवसे विरोधात पत्रकाराचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन




पडोली पो. स्टे. चे ठाणेदार योगेश हिवसे विरोधात पत्रकाराचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.

खाकी वर्दीचा दुरुपयोग
.. संहिता नियम, २०२१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी..

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-

पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे हे अवैध धंदेवाईक यांचे संरक्षण करतात आणि अवैध धंदेवाईक यांच्या अड्ड्यावर पत्रकार बातमी करिता गेले असता त्यांना अवैध व्यवसाई बेदम मारहान केल्यानंतर त्यांच्या विरोधात पत्रकार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला गेल्यानंतर अवैध व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोडून उलट पोलिसाकडून पत्रकाराला धमकावल्या जात असल्याने भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांचेवर ठाणेदार योगेश हिवसे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नसताना खाकी वर्दीचा दुरुपयोग करून त्यांनी गुन्हे दाखल केले. त्या विरोधात इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूर तर्फे सर्व पत्रकारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास जेष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यासाह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे.

भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) द्वारे प्रेसला संरक्षण देण्यात आले आहे, जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची हमी देते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वारंवार निर्णय दिला आहे की, हे प्रेस स्वातंत्र्याचा समावेश करते, शिवाय आपल्या महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण अधिनियम 2017 व पत्रकार सुरक्षा कायदा 2019 अन्वये पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण दिले आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनातले पडोली पोलीस स्टेशनं चे ठाणेदार योगेश हिवसे यांनी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजू कुकडे यांचेवर पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंदे याबद्दल बातमी दिल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे जें पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व पत्रकार संरक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याने पत्रकार संतापले आहे.

भारत सरकार ने माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ अनुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान ( डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, २०२१ अधिसूचिना काढली आहे, त्यानुसार कुठल्याही न्यूज पोर्टल व इलेक्ट्रॉनिक न्यूज चैनेल, यु ट्यूब चैनेल च्या पत्रकारावर पोलीस स्टेशन मध्ये बातम्या संदर्भात सरळ गुन्हा नोंद होऊ शकतं नाही, त्यासाठी या कायाद्यानुसार डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नुसार अगोदर संबंधित संपादक यांचेकडे तक्रार नोंद करावी लागते, त्यांनंतर जर सकारात्मक उत्तर संपादक यांनी दिले नाही तर त्यांचे जिल्हा न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंव्हा उच्च न्यायालयाचे अधिवक्ता यांची नियुक्ती केलेल्या डिजिटल मीडिया मध्यस्थाकडे प्रकरण वर्ग केल्यानंतर त्यांचेकडे सुनावणी झाल्यानंतर मग गुन्हा नोंद करायचा की नाही याबद्दल निर्णय पोलीस प्रशासन घेऊ शकते, मात्र पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे यांना सदर कायाद्याचे ज्ञान नसल्याने त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या पदाचा दुरुपयोग करून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंजूर केलेल्या डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम, २०२१ चे उल्लंघन केले आहे, या प्रकरणी त्याचेवर पत्रकारांचा पत्रकार सरक्षण अधिनियम 2017 व पत्रकार सुरक्षा अधिनियम 2019 अंतर्गत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन व उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचेवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणी करिता जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना पदाधिकारी आणि वार्ताहर पोलीस प्रशासनाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन उद्या दिनांक 26/9/2025 ला सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत करण्यात येत आहे, तरी या आंदोलनात सर्व पत्रकारांनी आपल्या हक्क अधिकारासाठी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसियएशन चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष
अनुप यादव संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकवणकर यांचेसह सर्व पत्रकार संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.