समाजातील विचारांचे झरे पोकळ होणार नाही, तो पर्यंत प्रज्ञा जागृत होणार नाही- गोपालकृष्ण मांडवकर
समाजातील  विचारांचे  झरे पोकळ होणार नाही, तो पर्यंत प्रज्ञा  जागृत होणार नाही-      गोपालकृष्ण मांडवकर अमरावती येथे महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ,आयोजित स्मरणिका विमोचन तथा पत्रकार सत्कार सोहळा!

अमरावती:-  महाराष्ट्र  नाभिक साहित्य कला दर्पण  संघातर्फे आयोजित  कलादर्पण स्मरणिका 2020 च्या प्रकाशन सोहळा व नाभिक समाजातील पत्रकारांचा अतिशय देखणा सत्कार  टाऊन हॉल, अमरावती येथे अतिशय सुंदर आयोजनात संपन्न झाला. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शरद ढोबळे सर, माननीय ज्येष्ठ साहित्यिक महर्षी आ. डॉ.  ईश्वर नंदापुरे,   कादंबरीकार मा.  भरत माने,मा.  भगवांजी चित्ते, मा. गोपालकृष्ण मांडवकर, मंचावर अनेक साहित्यकारांची तथा महाराष्ट्रातील  सन्माननीय नाभिक समाजातील पत्रकार मंडळीच्या  उपस्थित सोडायला सोनेरी किनार लावून गेली. अशा उत्तम देखण्या सोहळ्याचा आयोजनाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महर्षी डॉ. ईश्वर नंदापुरे म्हणाले की,  नाभिक समाजाला मुळातच निसर्गनिर्मित सुंदरतेची देन मिळालेली आहे.  त्यातून  समाजाचे साहित्यसंमेलन होणे, त्या साहित्य संमेलनातून समाजासमोर सुंदर विचार मांडण्याचे साधन हेच माणसाला सुंदर बनवून जाते. माणूस हा नर की मादी  होण्यापेक्षा  तो माणूस म्हणून समाजात जगणे हे महत्वाचे आहे. आणि हे अशा साहित्य संमेलनातूनच  घडू शकते.  असे मत मांडले.    
नाभिक साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, ह्या बाळरुपी साहित्याची यशोगाथा नाभिक समाजाच्या यशाची नव्हे तर इतर समाजाला  प्रेरणा ठरणार आहे.  साहित्य संमेलनाची यशोगाथा  साहित्याच्या माध्यमातून समोर चालू  ठेवण्याची गरज आपल्या सर्वांवर आहे. पत्रकार सन्मान करण्यात आला .  पत्रकारितेचा एकेकाळचा काळ कठीण होता. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या करणे सोपे झाले असले तरी,   पत्रकारिता करताना ते आव्हान कठीण झाले आहे.  पत्रकार यांच्या माध्यमातून अधिष्ठान होणार नाही, तर पुढच्या पिढीला काय कळणार.  प्रतिभा सर्वात आहे ती तुम्ही-आम्ही ओळखली पाहिजे.  आज समाजातील झरे आटलेले आहे.  पूर्वी विहिरीतून पाणी काढायचे,  आता  विहिरीत पाणी टाकावे लागत आहे.  समाजातील विचारांचे झरे पोकळ  होणार नाही,  तोपर्यंत प्रज्ञा जागृत होणार नाही!  समाजातील महिलांचा गौरव केला पाहिजे.  महिलांना विद्रूप  करण्याचे काम केले जात होते.   त्यावर बंड  करण्याचे काम नाभिक समाजाने केले.  देशातील  महिलांची केशओपनप्रता  बंद करण्याचे काम नाभिक समाजाने केले.  म्हणून समाजात महिलांचा गौरव केला पाहिजे. नाभिक समाजाचा इतिहास आहे. त्या सोनेरी पाने ज्ञात आणि अज्ञात दडलेली आहे, त्या पूर्वजांचे अनुकरण केले पाहिजे. पुढच्या येणाऱ्या पिढीला या साहित्य संमेलनासारख्या सोहळ्यातून आपल्याला घरोघरी पोहोचवायचे आहे .असे विचार मांडवकर यांनी मांडले.
या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या श्रीमती सुनिताताई वरणकर,  मुकुंद  धजेकर, प्रकाश नागपूरकर,  दिपक माथुरकर,  विशाल कान्हेरकर,  सतीश कान्हेकर,  संचालन व  आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.