जिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयाशी संबंधित 106 संस्था अवसायानात ; 20मार्चला सभाजिल्हा दुग्ध व्यवसाय कार्यालयाशी संबंधित

106 संस्था अवसायानात ; 20मार्चला सभा

 


चंद्रपूर :

 राज्य शासनाच्या जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात आज पशु, दुग्ध व मत्स्य सहकारी 106 संस्थांची यादी अवसायानात काढण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. अवसायानात काढण्यात आलेल्या या संस्थांची 20 तारखेला अंतिम सभा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये दुग्ध उत्पादन, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन शेळी-मेंढीपालन संबंधित अनेक सहकारी संस्था आहेत. मात्र या संस्थांनी सहकार कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही वेळोवेळी केलेली दिसून येत नाही. यामध्ये एकट्या दुग्ध सहकारी संस्थांची संख्या 101 असून त्यांनी आवश्यक कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे .मत्स्य सहकारी संस्थांची देखील संख्या 3 असून कुक्कुटपालन व शेळी-मेंढीपालन संस्थेची संख्या 2 आहे. एकूण अवसायनात निघालेल्या 106 संस्था जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यरत आहे.

सहाय्यक जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी एन. बी. निंबाळकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकामध्ये या संपूर्ण 106 अवसायानात काढण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या अंतिम बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीचे आयोजन 20 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 या काळात जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, चंद्रपूर प्रशासकीय भवन पहिला मजला चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.