कैलास अग्रवाल यांच्या नागाडा कोळसा टालवर अजूनही बेकायदेशीर कोळसा वाहतूक सुरूच !

कोळसा चोरी प्रकरण :-

पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह ? कोळसा टालवर येणारा आणि तिथे पडून असलेल्या कोळशाच्या चौकशीचे काय ?

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर जिल्ह्यातील नागाडा कोळसा टाल वर मिळालेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून लघु ऊद्धोगात जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी जब्त करून कोळसा माफिया कैलास अग्रवाल सह इतरांवर गुन्हे दाखल केले होते, मात्र या प्रकरणी न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन दिल्याने जनतेत मोठा संताप निर्माण झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील वेकोलि खाणीतून दरवर्षी कोल इंडियाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित नागपूर, या कंपनीला महाराष्ट्रातील विज निर्मिती केंद्र, खाजगी लघु ऊद्धोग इत्यादींना सबसिडीवर कोळसा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले गेले आहे, आणि त्यांच्याद्वारे वर्षाकाठी अब्जावधी टन कोळसा हा कंपन्यांना पुरवठा केल्या जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित नागपूर आणि कोळसा माफिया यांच्या एका करारानुसार ज्या कंपन्या बंद आहे व ज्या कंपन्याना कोळशाची जास्त आवश्यकता नाही अशा कंपन्यांच्या संचालकांसोबत एक छुपा करार केल्या जातो व त्या अंतर्गत सबसिडीचा कोळसा हा कोळसा माफियांनी जे बेकायदेशीर कोळसा टाल तयार केले त्या कोळसा टालवर सबसिडीच्या कोळशाच्या गाड्या उतरवील्या जातात व तिथून कोळशाची ग्रेड्डिण्ग करून तो कोळसा खुल्या मार्केटमधे विकला जातो . एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विज निर्मिती केंद्रातील व्यवस्थापनासोबत सुद्धा महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अधिकारी आणि कोळसा माफिया मिळून कोळशाची परस्पर उचल करून खुल्या मार्केटमधे चढ्या भावाने विकल्या जात आहे विशेष म्हणजे कोल इंडिया अंतर्गत महाराष्ट राज्य खनिकर्म महामंडळाला जे कोळसा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे ती कंपनीच मुळात कमिशनच्या चक्कर मधे चोरीच्या या लफड्यात अडकलेली असून वेकोलि कोळसा खाणीतून निघणारा कोळसा हा सरळ ऊद्धोगाना जायला हवा, मात्र खनिकर्म महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा कोळसा माफियांसोबत असलेला करार आणि ठरलेले कमिशन यामुळे ऊद्धोगात जाणारा कोळसा हा कोळसा माफियांच्या बेकायदेशीर व अनधिकृतपणे चालणाऱ्या कोळसा टाल वर उटरविल्या जातो आणि तिथून ग्रेड्डिण्ग करून तो खुल्या मार्केटमधे खुलेआम विकल्या जातो आहे. हा प्रकार चंद्रपूर तालुक्यातील नागाडा येथील कैलास अग्रवाल या कोळसा माफियांच्या कोळसा टालवर सुरू होता.त्या कोळसा टालवर तब्बल २४ कोळशाचे बेकायदेशीर ट्रक पोलिसांनी दिनांक १७ फेब्रुवारीला पकडलेले होते. व कोळसा माफिया कैलास अग्रवाल चंद्रपूर, यांचेसह आसिफ रहमान वणी, शहजाद शेख नागपूर इत्यादींवर भांदवी ४२० व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. परंतु पोलिसांनी नंतर हवे ते पुरावे न्यायालयात सादर केले नसल्याने जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला. त्यामुळे आता कोळसा चोरीचे हे जवळपास हजारो कोटी रुपयाचे प्रकरण थंड बस्त्यात जाण्याचे संकेत असल्याने व शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीची लूट सुरू असल्याने या प्रकरणी दोषी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर , सबसिडीचा कोळसा मिळविणाऱ्या कंपन्याचे संचालक आणि जिल्ह्यातील जिल्हा ऊद्धोग केंद्राचे व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली असलेली समितीचे अधिकारी यांची सीबीआय चौकशी करणे गरजेचे आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि खाणीतून सुद्धा कोळसा चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक प्रकरण समोर आले होते व या कोळसा चोरीतून वेकोलिच्या अधिकाऱ्यांना धमकावने, सुरक्षा रक्षक यांच्यावर हमला करणे इत्यादी प्रकार राजरोसपणे सुरू आहे, शिवाय बेकायदेशीर कोळसा टाल अजूनही सुरूच आहे व त्या कोळसा टाल वर अजूनही कोळशाचे ट्रक खाली करणे सुरूच आहे त्यामुळे कोळसा चोरीच्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेचे राजू कुकडे यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय कोळसा मंत्री, सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.