आमचे खरे हीरो ! आरोग्य कर्मचारी 24 तास कार्यरत, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज




आमचे खरे हीरो ! आरोग्य कर्मचारी 24 तास कार्यरत

कोरोना प्रतिबंधासाठी


साठी जिल्हा प्रशासन सज्ज



चंद्रपुर, दिनचर्या न्युज :-


कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सक्त पाऊले उचलली असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसला तरी ग्रामीण व शहरी भागात खबरदारी म्हणून आरोग्य कर्मचारी 24 तास कार्यरत आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये व लगेच प्रतिबंध घालता यावा यासाठी प्रत्येक घरोघरी जाऊन आशा सोबत सर्व अंगणवाडी सेविका मार्फत 24 मार्च 2020 पासून सर्वे सुरू आहे.

या सर्वेमध्ये परदेशातून तसेच बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव व मोबाईल नंबर यासह इतर सर्व माहितीची नोंद घेतली जात आहे.

जिल्ह्यामध्ये तसेच तालुकास्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष व संपर्क दूरध्वनी क्रमांक जारी केले आहे. यामार्फत मुंबईपुणे व इतर बाधित जिल्ह्यातून आलेले सर्व विद्यार्थीविद्यार्थिनी व इतर व्यक्ती यांना दिवसातून एकदा दूरध्वनीद्वारे संपर्क करीत असून त्यामार्फत संबंधित सर्व 24 तास घरामध्ये 14 दिवस राहणे अनिवार्य आहे असे सांगण्यात येत आहे.

जे नागरिक विदेशातून जिल्ह्यात आलेले आहेत त्या सर्वांना एक दिवसात दोन भेटी व दोनदा दूरध्वनीद्वारे संपर्क आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात येत आहे.

सोबतच जिल्हा प्रशासनामार्फत निर्देश दिलेले सर्व विदेशातून आलेले व्यक्ती 24 तास होम कॉरेन्टाईन होत आहे की नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी अशा व्यक्तींना सकाळी आरोग्य विभागाच्या पथकामार्फत  आणि सायंकाळी पोलीस विभागामार्फत गृहभेट दिली जात आहे.

जर  तापकोरडा खोकलाजिभ व गळा खसखस करणेसर्दी असल्यास अशा व्यक्तीला वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे.चंद्रपूर शहरात फॉरेस्ट अकॅडमी वसंत विहार येथे कॉरेन्टाईन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जी व्यक्ती विदेशातूनबाहेर राज्यातून बाहेरील जिल्ह्यातून आलेली आहे.त्या सर्वांनी 14 दिवस स्वतःच्या घरातच राहणे अनिवार्य आहे.ज्यांना कोणत्याही प्रकारचा आरोग्य संबंधित त्रास निर्माण झाल्यास त्यांनी त्वरित  जिल्हा सामान्य रुग्णालय       07172-270669जिल्हा परिषद आरोग्य विभाग 07172-261226चंद्रपुर महानगरपालिका 07172-254614 व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 07172-251597 किंवा टोल फ्री क्रमांक 1077,जिल्हा पोलिस यंत्रणेने देखील आपले नंबर जाहीर केले असून पोलीस यंत्रणेशी संपर्क साधायचा असल्यास              07172-273258,263100 या प्रमुख क्रमांकावर संपर्क