धक्कादायक :-अखेर या नराधम स्पोर्ट शिक्षकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल !
चार वर्ष स्पोर्ट शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे केले शारीरिक शोषण!
चंद्रपूर प्रतिनिधी:दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर शहरातील एका नामांकित कॉलेज मधील विद्यार्थिनीने विनोद सखाराम भरटकर या स्पोर्ट गेम शिकविण्याऱ्या प्राध्यापकांविरोधात केलेल्या तक्रारी वरून शहर पोलिस स्टेशन मधे कलम ३७६, पॉस्को व ऐक्ट्रासिटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने चंद्रपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे “तुला करियर करायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक सबंध ठेव” अशा प्रकारची धमकी विनोद भरटकर यांनी देवून तब्बल चार वर्ष आपल्याच प्रशिक्षणामधे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण केले असल्याची बाब आता उघड झाली आहे. या बाबत शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बहादूरे
यांनी संपूर्ण माहिती घेवून शेवटी आरोपी विनोद भरटकर यांना काल रात्रीच अटक केली. या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी नांदेडकर यांनी अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना दिली.