दारूबंदीच्या समीक्षा अहवालाने चंद्रपूरच्या आशा पल्लवित होणार का?



दारूबंदीच्या समीक्षा अहवालाने चंद्रपूरच्या आशा पल्लवित होणार का?

 चंद्रपूर:-   जिल्ह्यात दारूबंदी 1 एप्रिल २०१५ पासून झाली.  मात्र जिल्ह्यात अक्षरशः दारूबंदीचा कुठलाही परिणाम झालेला दिसला नाही.  चंद्रपुरात दारूचा  अक्षरशः महापूर   वाहू लागला.  म्हणून जिल्ह्यात दारूबंदी   बंद रहावी  की सुरु रावी,  यासाठी जिल्ह्यातील प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या.  त्यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल  खेमनार  यांच्या नेतृत्वात शासकीय समिती नेमण्यात आली.  या समितीने  केलेल्या सर्वेनुसार आणि प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया नुसार जिल्ह्यातील 2, 50, 000 पेक्षा जास्त निवेदन प्राप्त झाली.  या निवेदनावर काही संस्थांकडून आक्षेप नोंदविण्यात आला होता.   दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी अचानक उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात भेट देऊन संपूर्ण  माहिती प्राप्त करून, झालेल्या निवेदनाच्या बाबतीत माहितीची तपासणी करून दिनांक 16 /3/2020  ला  जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या  समोर समीक्षा अहवाल सुपूर्द  करण्यात आला.  मात्र, अहवाल हा  जनतेच्या भावनाचा आधार करणारा  असेल यात दुमत नाही?  मी आज  या अहवालाची चाचपणी करून, या संदर्भाची माहिती तुम्हाला लवकरच मिळेल वक्तव्य करून,  हा अहवाल उद्या ठेवल्या जाईल आणि जिल्ह्याला आणि सर्वांना जे पाहिजे ते मिळणार म्हणून आशा पल्लवित होणार, असे सांगून चंद्रपुरात खराच पुन्हा  मधशौकीनाच्यां  आशा पल्लवित होणार?  असे म्हटले तर वावगे होणार नाही!