चंद्रपूरच्या कोळसा माफियांचे नागपूरला मोठे बस्तान ?

नागपूरला पारडी नाका परिसरात बेकायदेशीर चालतात कोळसा टाल? बेकायदेशीर कोळसा टाल बनले कोळसा चोरीचे अड्डे ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील नागाडा परिसरातील कोळसा टाल वर बेकायदेशीरपणे लघु ऊद्धोगाकडे जाणारा कोळसा खाली करतांना पोलिसांनी तब्बल २६ कोळसा ट्रक गाड्या पकडल्या नंतर भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलमधून पहिली बातमी प्रकाशित झाली होती आणि कोट्यावधीचा कोळसा घोटाळा समोर आला होता, त्या दरम्यान प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्याने कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना शांत केले अशी चर्चा होती, मात्र भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर या कोळसा चोरी प्रकरणी कारवाईचे अपडेट प्रकाशित होतं राहिल्यामुळे पोलिस तपासाला वेग येऊन महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे कोळसा पुरवठा करण्याचे अधिकार वेकोलिने काढून टाकले होते व ती कोळसा वाहतूक बंद करण्यात आली. तरीही कोळसा ऑक्शनच्या नावाखाली आजही कोट्यावधी रुपयाचा कोळसा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोळसा टालवर उतरवील्या जात असून त्यामधे काही गाड्या मागील कोळसा घोटाळ्यातील कोळशाच्या जात असल्याचा सुद्धा प्रकार सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा माफियांनी कोट्यावधी रुपयाचा माल कोळसा चोरीतून मिळविल्यानंतर त्यांनी नागपूर येथील पारडी नाका परिसरात आपले बस्तान बेकायदेशीर कोळसा टाल तयार करून बसविले असल्याची विश्वसनीय माहिती आहे, आणि तिथे सुद्धा चंद्रपूरच्या तिनपट कोळसा स्टॉक असल्याचे कळते यावरून बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल हे कोळसा तस्करीचे अड्डे बनले असून जोपर्यंत हे बेकायदेशीर कोळसा टाल बंद होणार नाही तोपर्यन्त कोळसा चोरी प्रकरणाला आळा बसणार नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेवून हे बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल त्वरित बंद करावे अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.