वेकोलि अधिकारी व कोळसा माफियांच्या संगनमताने वेकोलिचा कोट्यावधीचा कोळसा चोरी ?लॉकडाऊनचा गैर फायदा!

वेकोलि अधिकारी व कोळसा माफियांच्या संगनमताने वेकोलिचा कोट्यावधीचा कोळसा चोरी ?लॉकडाऊनचा गैर फायदा! 

*घूग्गूस सब एरिया मैनेजर, कोळसा सायडिंग बाबू आणि काही पत्रकारांच्या संगनमताने घूग्गूस सायडिंगचा कोळसा नागाडा कोळसा टालवर ? *पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास किमान ६ ते ७ लोकांवर होऊ शकते पुन्हा गुन्हे दाखल, *लॉक डाऊनच्या आडून कोट्यावधीच्या कोळशाची खुलेआम चोरी उघड !

कोळसा चोरी भाग- २

घूग्गूस प्रतिनिधी :-

संपूर्ण देशात कोरोना व्हायरस संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतांना इकडे मात्र वेकोलिच्या पैनगंगा कोळसा प्रकल्पातून आलेल्या कोळशाच्या ट्रक गाड्या घूग्गूस कोळसा सायडिंगवर खाली न होता त्या नागाडा बेकायदेशीर कोळसा टालवर खाली होतं होत्या व दररोज सहा ते सात कोळसा ट्रक या टालवर खाली होतं असल्याने लॉक डाऊन च्या काळात कोट्यावधीच्या वेकोलिच्या कोळशाची चोरी होतं होती. मात्र या कोळसा चोरीची भनक काही पत्रकारांना लागल्यामुळे आता कोट्यावधीच्या कोळसा चोरीचा प्रकार समोर येईल त्याचंमुळे दिनांक १४ मार्चला तब्बल २३ दिवसांनंतर पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेल्या तीन ट्रक गाड्या घूग्गूस कोळसा सायडिंग वर येवून कोळसा खाली न करता त्या गाड्या कोळसा भरूणच बाहेर जात असल्याबद्दल तक्रार घूग्गूस पोलिस स्टेशन मधे देण्यात आली आणि बघा आम्ही तर पोलिस तक्रार केली आहे हे दाखवून वेकोलि अधिकारी व कोळसा माफियांनी कोट्यावधीची कोळसा चोरी लपवीण्यासाठी तीन ट्रक चालकांना मोहरा बनविला असल्याची बाब उघड दिसत आहे.

पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेले तीन ट्रक घूग्गूस सायडिंगवर खाली न करताही रिटर्न पर्ची ट्रक चालकाला दिली जाते याचा अर्थ घूग्गूस कोळसा सायडिंग वरून निघालेल्या ट्रक गाड्यांना स्वतः तेथील बाबू व अर्थातच घूग्गूस वेकोलि सब एरिया मैनेजर यांचा या कोळसा चोरीत हात आहे हे शीद्ध होते. असे असतांना त्या ट्रक गाड्या नागाडा येथील बेकायदेशीर चालत असलेल्या कोळसा टालवर खाली होतात व नंतर त्या पैनगंगा कोळसा खाणीमधे रिटर्न पर्चीसह दाखल होतात पण ती माहिती तब्बल 23 दिवसांनंतर तेथील वेकोलि महाप्रबंधक अजय सिंह यांना कळते आणि ते त्या तीन ट्रक गाड्या चालकाविरोधात घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तक्रार देतात की ज्या तीन ट्रक क्रमांक MH34 – BG 5165, MH34-BG 5265, व MH34-BG 6905 ह्या ट्रक चालक नामे गौरीशंकर , तलाश , उमेश यांनी घूग्गूस सायडिंग वर खाली न करता त्या गाड्या बाहेर नेल्या अर्थात त्या नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टालवर खाली केल्या.
यामधे प्रश्न उभा राहतो की जेंव्हा कोळसा घूग्गूस कोळसा सायडिंग वरून चोरीला गेला तर त्याची तक्रार सायडिंग इन्चार्ज व त्या घूग्गूस क्षेत्रातील सबएरिया मैनेजर यांनी करायला हवी होती, मात्र ज्या अजय सिंह यांचा ह्या कोळसा चोरी प्रकरणाशी काहीएक समंध नसतांना व त्यांना तीनही ट्रक कोळसा खाली झाल्याची पावती मिळाली असतांना तब्बल २३ दिवसांनंतर त्यांना घूग्गूस पोलिसात तक्रार दाखल करण्याची आवश्यकता कां होती ? खरं तर पैनगंगा वेकोलि महाप्रबंधक अजय सिंह यांनी दिलेल्या तक्रारी मुळेच हे कोळसा चोरीचे प्रकरण समोर आले आहे पण काय यामागे लाखों टन कोळसा चोरी गेल्याने व वेकोलि अधिकारी कर्मचारी व कोळसा माफिया यांच्या संगनमताने कोळसा चोराला जात होता हे दडपण्यासाठी अजय सिंह यांना समोर केले तर नसावे? अशीही शंका निर्माण होतं आहे.

अगोदरच नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टालवर सबसिडीच्या कोळसा चोरी संदर्भात कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्या सह तीन लोकांवर गुन्हे दाखल आहे. व आणि आता चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीर कोळसा टाल हे कोळसा माफियांनी कोळसा चोरीचे अड्डे बनविले असून वेकोलि अधिकारी, पोलिस आणि कोळसा माफियांच्या संयुक्त प्लान मधून कोळसा चोरीचे हे सत्र सतत लॉक डाऊन च्या काळात सुरू होते, यामधे दररोज सहा ते सात कोळसा ट्रकचा हिशोब पकडला तर कां दिवसात जवळपास सात ते आठ लाख रुपयाचा कोळसा घूग्गूस कोळसा सायडिंग वरून चोरी होतं होता, व सतत एक महिना हे कोळसा चोरीचे सत्र चालत होते त्यामुळे वेकोलिचा कोट्यावधीचा कोळसा चोरी गेला ही अतिशय गंभीर बाब आहे ती समोर येवू नये याकरिता तीन ट्रक चालकांना मोहरा बनवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे, या प्रकरणी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण असून जर त्यांनी या कोळसा चोरीच्या मुळाशी जावून तपास केला तर या प्रकरणात काही पत्रकार यांच्यासह किमान पुन्हा सहा ते सात आणखी लोकांवर गुन्हे दाखल होईल अशीच एकून परिस्थिती आहे.