गणेशाचा कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, तपासात मृतकाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार घटना उघडकीस .
गणेशाचा कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, तपासात मृतकाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार घटना उघडकीस!

दिनचर्या न्युज :- भद्रावती -

भद्रावती शहरात 21 मे गुरुवार रात्री 12च्या सुमारास गणेश उर्फ अतुल वाटेकर (28) किल्ला वॉर्ड येथे कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मृतकाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार उघडकीस आली होती.

परंतु अधिक तपासात ही घटना आत्महत्या नसून खुद्द पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याचे समोर आले असून त्याची तिने कबुली ही दिली आहे.

सविस्तर वृत्ता नुसार भद्रावती शहरातील किल्ला वार्ड येथे राहणाऱ्या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ही बनाव असून प्रत्यक्षात त्याचा त्याच्या पत्नीनेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मृतकाची पत्नी प्रणाली गणेश वाटेकर (25) रा. किल्ला वॉर्ड असे आरोपीचे नाव असून तिने आपला पती गणेश उर्फ अतुल वाटेकर याचा सततच्या कौटुंबिक वाद, संशय यामुळे त्रस्त होऊन केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी बयान कथन नुसार दोन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. विवाहानंतर सतत पती कमी व पत्नी जास्त शिकलेली यावरून तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यात भांडणे होत होते. सततच्या या मानसिक जाचाला कंटाळून आरोपी आपल्या माहेरीही निघून गेली होती.

परंतु काही दिवसांपूर्वी गणेश हा त्याच भागात वेगळा राहू लागला होता. घटनेच्या 21 मे रोजी रात्री 12 च्या सुमारास प्रणालीने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केलची माहिती पोलिसांना दिली.

मात्र मृतक गणेशचा भाऊ हेमंत वाटेकर याने आपल्या भावासोबत काही घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळं पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व प्राथमिक अहवाल याआधारे चौकशी सुरु केली.

पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली असता प्रणालीने काही सतत उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे तिच्यावर संशय अधिक बळावल्याने तिला वारंवार विचारणा केल्यावर, तिच्या वेगवेगळ्या उत्तरांमधून अनेक प्रश्न समोर आल्याने आता आपले गुपित उघडणार या भीतीने पतीला स्वतःच मारले असल्याची कबुली दिली.

कबुलीत आपणच पतीचे दोन्ही हात बांधून त्याच्या गळ्यावर दुपट्टा आवळून व त्याच्या नाकातोंडावर उशी ठेवून त्याला ठार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.