नाभिक एकता मंच नागपूर शहरची सभा, सलून दर वाढविण्याचा निर्णय!
नाभिक एकता मंच नागपूर शहरची सभा, सलून दर वाढविण्याचा  निर्णय! 

नागपूर :दिनचर्या न्युज

आज शनिवार दि. 23/ 5 / 2020 ला सकाळी 10 वा. नाभिक एकता मंच अध्यक्ष यांचे निवासस्थानी श्री. धनराज वलुकार यांच्या अध्यक्ष खाली इंगोले नगर हुडकेश्वर नागपूर येथे सोशल डिस्टन व मास्क लावून सर्व पदाधीकारी यांनी नियमाचे पालन करून सभा घेण्यात आली. या सभेत शहरातील दुकान सुरू करण्याविषयी व सलुन दर यात वाढ करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या लॉकडावून बंद मुळे सर्व सलुन दुकान बंद असल्याने दुकानदार आर्थीक बाजुने कमजोर झाला असून. शासनाने नागपूर ग्रामीण ला काही तालुका येथील नियम व अटी देवून सलुन दुकान सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
नागपूर शहरातील सर्व सलुन दूकान सुरू करण्याचे लवकरच निर्देश देण्याचे संकेत असून शासनाचे नियम व अटी मान्य करून सलुन दूकान सुरू करण्याची परवांगी मिळेल. शासनाच्या नियम व अटी यामध्ये सलुन दुकानदार यांना इतर खर्च सोसावा लागणार आहे. या करीता नागपूर शहरातील सलुन दर वाढवावे लागणार या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये उपस्थीत सर्वांच्या संहमंतीने *1) हेअर कट - 100 रू. तर 2) शेवींग - 50 रू. व हेअर कट, शेवींग -150 रू. दर घेण्याचे ठरले.* या सभेमध्ये नाभिक एकता मंच चे अध्यक्ष श्री. धनराज वलुकार , उपाध्यक्ष श्री. हरीराम चोपकर , सहसचिव श्री. गजानन कूकडकर , कोषाध्यक्ष श्री. गणेश उमरकर , दू. संघ शहर अध्यक्ष श्री. दिलीप लक्षणे , दू. संघ दक्षिण अध्यक्ष श्री. संतोष वैध , दु. संघ पूर्व अध्यक्ष श्री. प्रशांत चौधरी , ना.ए. मंच पूर्व अध्यक्ष श्री. शेषराव घूमे , उपाध्यक्ष श्री. मुरलीधर चन्ने , हुडके - नरसाळा ना.ए. मं. अध्यक्ष श्री. राजुजी साबळे , दु. संघ अध्यक्ष श्री. भूषण खातखेडे , ना.ए. मं. सचिव श्री. सुखदेव खंडाळकर , दू. संघ सचिव श्री. रवी लंगे , कार्याध्यक्ष दू. संघ श्री. ललीत कान्होलकर यांच्या उपस्थीत सभा संपन्न झाली.

दिनचर्या न्युज