28 तारखे पासून सलून दुकान सुरू करण्याचे आदेश





28 तारखे पासून सलून दुकान सुरू करण्याचे आदेश 

अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय 
दिनचर्या न्युज:-

राज्यात अखेर २८ जूनपासून (रविवार) सलून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. मुंबई सह राज्यभरात सलून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून सलून व्यावसायिकांनी त्याचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दरम्यान, सलूनमध्ये तूर्त फक्त केस कापण्यास परवानगी असेल, दाढी करण्यास परवानगी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत सांगोपांग चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझ करणे बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, तूर्त सलूनमध्ये केस कापण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे. दाढीबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस यावर बारीक निरीक्षण ठेवलं जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील, असे परब यांनी सांगितले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या शासर स्थरावर
प्रांतअध्यक्ष कल्याण दळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सरकारला सलून, पार्लर सुरु करण्याणास भाग पाडले. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.
सरकारच्या या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करण्यासाठी चंद्रपूर महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, बारा बलुतेदार कार्याध्यक्ष शाम राजूरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कडवे, सचिव कृणाल कडवे, कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने, दत्तात्रय पंदिलवार, प्रभाकर चौधरी, राजू कोंडस्कर, निलेश बडवाईक, जितेंद्र पेंडल्लवार, शिवम चौधरी,
यानी सरकारचे गांधी चौक येथे अभिनंदन केले.