नाभिक सलून दुकानदार, कारागीर यांच्या मागण्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन
दिनचर्या न्युज :- चंद्रपूर
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. कल्यानराव दळे साहेब यांच्या सूचने नुसार दी. ५ जून २०२० रोजी सम्पूर्ण राज्यभरातील जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. निवेदना मधे स्पष्ट मताने नमूद केले होते की, दी. ८ जून २०२० पर्यंत जर शासनाने आमचा विचार केला नाही तर आम्ही सर्व समाज बांधव आदरणीय कल्यानराव दळे साहेबांच्या नेतृत्वात तीव्र आन्दोलनाची भूमिका घेऊन,
आन्दोलनाचा इशारा देऊन सुद्धा जर शासन आमची बाजू समजून घ्यायला तैयार नसेल तर आता आन्दोलन केल्या शिवाय पर्याय नाही. करिता आपले नेते राज्याचे अध्यक्ष मा. कल्यानराव दळे साहेब यांनी दी. ९ जून २०२० रोजी धोपटी आन्दोलन पुकारले आहे.
जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व नाभिक सलून व्यावसायिकांच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्य़ाधिकारी यांच्या मार्फत राज्य सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.
सर्व नाभिकांची दैनिय अवस्था झाली असून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सरकारने नाभिक सलून दुकानदार, कारागिरांना आर्थिक मदत द्यावी, कर्नाटक, दिल्ली मध्यप्रदेश राज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने १०,००० रू. मासीक आथिर्क साह्य करावे, सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी,
लाँकडाऊनच्या कालावधीत मध्ये शासनाच्या सर्व नियम अटींचे पालण करून करत असलेल्या आथिर्क दृष्टय़ा मागास असलेल्या सलून मालक, कारागिरांनवर उपासमारीची वेळ असताना शुध्दा आपले व्यवसाय बंद ठेवून शासनास सर्वतोपरी सहकार्य केले. एवढेच नव्हे तर शासनाच्या अटी-शर्ती पालन करित असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने ३१मे रोजी राज्यात सलून दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे नाभिक सलून दुकानदारवर फार मोठे आथिर्क संकट उभे राहिले आहे.
सलुन व्यवसायावर अवलंबून असणारे कुटुंबांना भूकमारीची पाळी आली आहे. सलून दुकान बंद राहीलेतर सलून चालक, कारागिरांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
म्हणून सरकारने सलून दुकानदारवर काही बाबींमध्ये शिथिलता, अटी-शर्ती लावून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा आर्थिक साह्य करावे.
सलुन बंद बाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळा च्या वतिने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे .या वेळी जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवनकर, कार्यधक्ष मानिक चन्ने, बारा बलुतेदार कार्याध्यक्ष शाम राजूरकर, शहर अध्यक्ष संदेश चल्लीरवार, सुनील कडवे, कृणाल कडवे, यांची उपस्थिती होती.
सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर, संपूर्ण राज्यभरात मोठे जनआंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ही शासन आणि शासनाची राहील. असे आव्हान संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनचर्या न्युज