सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश खाडे, एसीबीच्या जाळ्यात. १० हजार लाच घेताना रंगेहाथ अटक.

अपघाताच्या प्रकरणात आरोपी न करण्याच्या प्रकरणात मागितली होती लाच.

दिनचर्या न्युज :-
वरोरा प्रतिनिधी :- वरोरा पोलिस स्टेशन येथील एका अपघाताच्या गुन्हयात तकारदार यांना आरोपी न करण्याच्या कामाकरीता सहायक पोलिस निरीक्षक रमेश खाडे, यांना तक्रारकर्त्याकडुन १०,०००/-रु. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करून गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक घटना वरोरा येथे घडली. तक्रारदार यांची सहायक पोलिस निरीक्षक खाडे यांना लाचेची रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी खाडे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर कार्यालयात तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक १६.०६.२०२० रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती १०,०००/-रु. लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने वरोरा शहरातील बोर्डा चौक येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी रमेश संपतराव खाडे, वय ३० वर्षे, साहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वरोरा यांनी १०,०००/-रु. लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
ही कार्यवाही ही रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपुर, दुद्दलवार, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर,, तसेच पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात वैशाली ढाले, पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टॉफ नापोकॉ. अजय बागेसर, पो.कॉ, रविकमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे व चालक दाभाडे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाप्रवि तर्फे करण्यात येत आहे.