आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किटचे वितरण, सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा..:- देवराव भोंगळे

नाभिक बंधुंनी सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा...... देवराव भोंगळे*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किट चे वितरण*

चंद्रपूर :- दिनचर्या न्युज :-
कोरोनाच्‍या संकटामध्‍ये संपुर्ण जग भयभित झालेले असतांना अनेकांचे व्‍यवसाय ठप्‍प पडले. परंतु आता हळुवार का होईना टप्‍प्‍या - टप्‍प्‍याने लॉकडाउन उठविण्‍याची प्रकिया सुरू झाली. सामाजिक अंतर पाडुन सर्वांना व्‍यवसाय करायचा आहे. परंतु नाभिक बंधुंचा सलुन व्‍यवसाय जवळीक असल्‍याशिवाय होवू शकत नाही. त्‍यामुळे इतर सुरक्षा नियमांचा व साधनांचा उपयोग करून हा व्‍यवसाय होवू शकतो. त्‍यामुळे नाभिक बंधुंनी सुरक्षीत राहुन व्‍यवसाय करावा असे आवाहन भाजपा चंद्रपूर जिल्‍हा महामंत्री देवराव भोंगळे यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी शाखा चंद्रपूर च्‍या वतीने व आ. सुधीर मुनगंटीवार तर्फे नाभिक बंधुंना सुरक्षा किट वितरण उपक्रमादरम्‍यान आज (दिनांक 10 जुन) बुधवारला बोलत होते.
यावेळी उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर शहर सलुन असोसिएशनचे अध्‍यक्ष रविंद्र हनुमंते, भाजपा नेते डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, सुरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडु यांची उपस्थिती होती.

देवराव भोंगळे पुढे म्‍हणाले कोविड – 19 हा आजार कोरोनाच्‍या संसर्गामुळे होतो. त्‍यामुळे सामाजिक अंतर ठेवणे क्रमप्राप्‍त आहे. नाभिक बंधुंनी आपले कार्य करतांना मॉस्‍क, फेसशिल्‍ड, हॅन्‍डग्‍लोज, डेटाल, नविन टॉवेल यासारख्‍या वस्‍तुंचा वापर करायला हवा. इतकीच काळजी ग्राहकांनी देखील घ्‍यायला हवी असे म्‍हणाले. नाभिक बंधुना देण्‍यात आलेल्‍या सुरक्षा किट मध्‍ये बँग, सॅनिटायझर, साबण, मॉक्‍स, घडयाळ, बिस्‍कीट आदीचा समावेश होता. हनुमंते यांनीही सर्वांना सुरक्षीतता बाळगुन व्‍यवसाय करावा असे आवाहन केले.

दिनचर्या न्युज