या वसुंधरेने आपल्‍याला भरभरून दिले आहे तिला अल्‍पसे देण्‍याचा प्रयत्‍न करणे म्‍हणजे वृक्ष लागवड, ग्रामपंचायत नागाळा (सी)येथे वृक्षारोपण करण्याताना .





या वसुंधरेने आपल्‍याला भरभरून दिले आहे तिला अल्‍पसे देण्‍याचा प्रयत्‍न करणे म्‍हणजे वृक्ष लागवड करणे आहे.

दिनचर्या न्युज

वृक्ष लावणे हे ईश्‍वरीय कार्य आहे. गेल्‍या 5 वर्षात राज्‍यातील जनता, शासकीय व निमशासकीय कार्यालये, धार्मीक व सामाजिक संस्‍था आदी घटकांच्‍या सहकार्याने वृक्ष लागवडीची मोहीम राज्‍यभर राबविली. आज वनमहोत्‍सवासह हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आहे, डॉक्‍टर्स डे व पोस्‍टल डे आहे. आजचा दिवस हा वैशिष्‍टयपूर्ण दिवस आहे म्‍हणून आजच्‍या दिवशी वृक्ष लागवड करून वसुंधरेचे ऋण फेडण्‍याचा प्रयत्‍न आपण करूया, असे
माजी वनमंत्री तथा अर्थमंत्री.मा.आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून कृषिदिन निमित्याने गट ग्रामपंचायत नागाळा (सी.) अंतर्गत मौजा नागाळा, चिंचाळा वांढरी येथे विविध जातीचे झाडे लावून वृषारोपन करण्यात आले. यावेळी मा. नामदेव जी डाहुले तालुका अध्यक्ष भाजपा चंद्रपूर, मा. संतोषकुमार द्विवेदी जिल्हा सचिव भाजपा, डॉ शरद रणदिवे ता. महामंत्री तथा सरपंच नागाळा सी., सौं. प्रियांका करमनकर, अतिश चिमुरकर, सुनील मडावी, सुरेश मुंगुले, सुरेश पिदूरकर, विनोद करमनकर, श्री नागदेवते ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी नागाळा सी. उपस्थित होते.