आरोपीवर खुनाचा प्रयत्न केलेचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष अनुप यादव
केरोसीन मिश्रीत डिझेल विक्रीचा संशय व्यक्त जीवे मारण्याचा प्रयत्न - श्रीराम सेनेचा आरोप
चंद्रपूर ( दिनचर्या न्युज)
केरोसीन मिश्रीत डिझेल विक्रीचा संशय व्यक्त केल्याने, पेट्रोल पंप चालकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष अनुप यादव डिजिटल व्हिडिओ असोसिएशन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
पत्रकार परिषदेत बोलताना यानी संगीतले की
दिनांक 22/07/2020 ला सकाळी 11 वाजता अनूप यादव, इंडीका कार मध्ये डिजल भरण्याकरीता, चंद्रपूर चे बायपास रोड वरील पियूष जैन चे मालकीचे, पार्श्वनाथ पेट्रोल पंप पर डिजल भरण्याकरीता गेले व डिजल त्यांनी ट्रक करीता कॅन मध्ये घेतले असता, त्याला डिजेलचा रंग निळसर दिसला, अनुप यादव नी डिजल मध्ये केरोसिन मिश्रित असल्याचा संशय आल्याने, त्यांनी पेट्रोल पंपचे मालक पियूष जैनला याची तक्रार केली. यावरून पियूष जैन, त्याचा भाऊ वृषभ जैन व त्यांचा भाच्यानी मिळून अनुप यादव व त्याचा भाऊ शिवीगाळ करून रॉडने जीवे मारून टाकण्याचे उद्देशाने मारले. याबाबत अनूप यादव व दिलीप यादव याना गंभीर दुखापत झाली. या घटनेची अनूप यादव व दिलीप यादव यांनी रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. त्यांचे तक्रारी वरून रामनगर पोलिसांनी पियुष जैन व त्याचे भावा विरुद्ध भा द. वी. 324, 504 506, व 34 अन्वये गुन्हा दाखल केला.
मात्र दाखल केलेला गुन्हा सौम्य स्वरूपाचा असून आरोपीवर खुनाचा प्रयत्न केलेचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्रीराम सेनेचे कार्याध्यक्ष अनुप यादव डिजिटल मीडीया असोसिएशन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
केरोसीन मिश्रीत डिझेल विक्रीचा संशय व्यक्त केल्याने, पेट्रोल पंप चालकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पियूष जैन त्याचे मालकीचे पार्श्वनाथ पेट्रोल पंप वरून सर्रास केरोसीन मीश्रीत डिजलची विक्री करीत आहे. त्याची तकार संबधीत सरकारी अधीकार्यांकडे करतो म्हटल्या नंतर तो म्हणतो की सरकारी कर्मचारी को जेब में लेकर घुमता हू।" आणी म्हणतो की "कोई भी डिपार्टमेंट मेरा कुछ नही कर सकता.
पत्रकार परिषदेत आवाहन करण्यात आले की, पियूष जैन चे मालकीचे पार्श्वनाथ पेट्रोल पंप वरून वाहना मध्ये डीजल किंवा पेट्रोल भरत असतानी योग्य ती काळजी घ्यावी व सरकारी यंत्रणा नी पियूष जैन चे मालकीचे पार्श्वनाथ पेट्रोल पंप डीजल पेट्रोल ची चाचणी योग्य प्रकारे करून त्याचे वर कायदेशीर कार्यवाई करण्यात यावे.