प्रेमासाठी मोठ्या भावानेच संपवले धाकट्या भावाला!




प्रेमासाठी मोठ्या भावानेच संपवले धाकट्या भावाला!

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
दिनांक १३/०७/२०१७ रोजी रात्रौ अंदाजे २१/४५ वा. दरम्यान देवानंद जयवंतराव थोरात
वय ५४ वर्ष,रा.दुर्गापुर वार्ड क 0१ ता.जि. चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे येवुन पोलीस
निरीक्षक दिपक एस.खोब्रागडे
ह्यांना माहिती दिली की, दुर्गापुर वार्ड क. 0१ ता. जि. चंद्रपुर येथे
आकाश रामटेके
ह्याचे घराचे मागील सांदवाडीमध्ये कवेलु ठेवुन असलेल्या ठिकाणी मानसाच्या हाताचे
हाडासाखरे दिसत आहे. त्यावर कवाली ठेवलेले आहे. त्याठिकाणी डांबरगोळ्या पडलेल्या आहेत.
दुर्गधी येत आहे. वार्डामधील लोकांमध्ये त्याठिकाणी प्रेत पुरून असावे अशी चर्चा आहे. अश्या माहिती
वरून पो.नि.खोब्रागडे पो.स्टॉफ सपोनी मानकर,पोउपनि सोनोने स.फौ./३२८, पो.हवा/१९९९, पो
हवा/७०८,पो.हवा/२३०४,नापोशि २०७०,नेपालि २६३९,नापोशि २१४५, पो.शि./९३१,१६००
मपोशि/११७४,२०८० सह घटनास्थळी दुर्गापुर वार्ड क 0१ येथे पोहचुन पाहणी केली . जमिनीवर
ठेवलेल्या कवेलुच्या
खाली मानवी हाताचे हाडासारखे हाड दिसुन आले. त्या ठिकाणी मानवी प्रेत पुरून
ठेवले असल्याची दाट शक्यता आहे. खात्री झाली रात्रौची वेळ असुन अंधार असल्यामुळे कार्यवाही
करणे शक्य नसल्यामुळे सदर काईमशीन प्रिझर्व करून ठेवण्यात आले. योग्य गार्ड लावण्यात आली.
माहिती मा.पोलीस अधिक्षक साहेब यांना देवुन मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच अप्पर
पोलीस अधिक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले. रात्रौ दरम्यान तपासाची
चक फिरविण्यात आले. गोपणिय सुत्राकडुन माहिती मिळाली की,दुर्गापुर वार्ड क 0१ मध्ये राहणारा
अनिकेत उर्फ गोलु विपुल रामटेके हा मागील १० ते १२ दिवसापासुन बेपत्ता आहे.वस्तीमध्ये फिरतां
दिसत नाही.
अनिकेत विपुल रामटेके वय १७ वर्ष हा बेपत्ता असुन त्याचा मोठा भाउ गुन्हयातील
आरोपी अंकीत विपुल रामटेके वय २१ वर्ष हा सुध्दा फरार आहे. अनिकेत बाबत माहिती त्याची आई
श्रीमती वंदना विपुल रामटेके हिला विचारणा केली असता तिने सांगितले की,मोठा मुलगा अंकीत
ह्याने तिला सांगितले की,मृतक अनिकेत उर्फ गोलु हा बाहेर गावी काम करण्यासाठी गेला आहे.
मृतक अनिकेत उर्फ गोलुने आईजवळ काम करण्यासाठी जातो. असे सांगितले नाही. परंतु अंकित
आईजवळ सांगितले की गोलु बाहेरगावी काम करण्यासाठी गेला. हा मुद्दा संशयास्पद वाटत होता.
अंकित हा वस्तीमध्ये हाजर मिळुन आला नाही. पोलीस घटनास्थळी गेले. त्यावेळी वस्तीमधुन फरार
झाला. आरोपीने स्वत:चे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवले होते. त्याच रात्री पो.स्टे.परीसरात सवत्र
शोध घेतला मिळुन आला नाही. गुप्त बातमीदार लावण्यात आले.
अंकित रामटेके ह्याची शोध मोहीम लावण्यात आली. गुप्त बातमीदार द्वारे खबर मिळाली
की,अंकित रामटेके हा इरई कडे जाणाऱ्या रोडवरील बाजुला जंगलातील गुरांच्या गोठयामध्ये बसुन
आहे. तात्काळ त्याला ताब्यात घेतले. आरोपी हा अत्येत शातीर आणि चालाक आहे. सतत CID,
Crime patrol, सारख्या टी.व्ही.शिरीयल पाहत असते. सुरुवातीला काहीच सांगितले नाही. अशा
आरोपीचा Introgation मोठ्या कौशल्याने करावा लागतो. सखोल विचारपुस केली असता आरोपीचे
एका मुलीवर
प्रेम आहे.ते लग्न ही करणार होते. घटनेच्या सहा दिवसापुर्वी मृतक गोलु ह्याने तिची
छेडखानी केली. त्यामुळे आरोपीने अनिकेत उर्फ गोलु ह्याचा काटा काढण्याची योजना तयार केली.
गोलु ह्याला आपण दारूचा धंदा करू व दारूव्या पेट्या लपवुन ठेवण्यासाठी सत्यवान रामटेके
ह्याचे सांदवाडीमध्ये खड्डा तयार करू असे सांगितले. दोघांनी मिळुन खड्डा तयार केला.त्यावर
आरोपीने फिनाईल,डांबर गोळ्या,गळा आवरण्यासाठी रशी ,मिठ (नमक),युरीया(रासायनिक खत)
बॉडी लवकर Dicompose करण्यासाठी सर्व साहीत्ये आणुन ठेवले. ठरलेल्या योजने प्रमाणे
मृतक अनिकेत उर्फ गोलु ह्याला सत्यवान रामटेके ह्याचे घरी बोलाविले खुप दारू पाजली व गळफास
लावुन खुन केला. पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने पुर्वीच खुन ठेवलेले खड्यात प्रेत पुरले. दिनांक १४/०७/२०२० रोजी कार्यकारी दंडाधिकारी श्री गादेवार तालुका कार्यालय चंद्रपुर
आणि पंच यांचे समक्ष प्रेत उत्खन केले Inquest पंचनामा, घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करण्यात
आली.गुन्हा मा.पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरेउपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शणात पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे, API बावनकर, PSI सोनोने, पो.हवा खेडेकर, पो.हवा.चव्हाण पो.हवा माहूलीकर नापोशि उमेश,नापोशि योगराज ,नापोशि जयसिंग, पो.शि.मनोहर ,मपोशि भाग्यश्री, मपोशि कुमुद यांनीरात्रभर मेहनत घेवुन २४ तासाचे आत उडकिस आणला. पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे कलम ३०२,२०१
भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.