कसर्ला येथील युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा द्या; भाजपाची मागणी!
_पीडित युवतीच्या घरी सात्वनपर भेट; पोलीस अधीक्षकांना देणार निवेदन.! _
नागभीड: दि.9 जुलै- दिनचर्या न्युज
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कसर्ला शिवारात शुक्रवार 7 आगस्ट रोजी 16 वर्षीय अल्पवयीन युवतीवर गावातीलच दोन नराधमांनी बलात्कार केल्याने आघात सहन न झाल्याने सदर युवतीने शेतालगतच्या विहिरीत आत्महत्या केली.. मृत्यूपूर्वी सदर युवतीने लिहलेल्या चिट्ठी मध्ये दोन्ही आरोपींची नावे लिहल्याने व त्यांनी तिच्यासोबत बलात्कार केल्याचे स्पष्ट पणे लिहले असल्याने सदर प्रकरण स्पष्ट झाले आहे..!!
दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भावी आयुष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याने तिला तो आघात सहन न झाल्याने तिला आपले जीवन संपवावे लागले आहे... सदर दोन्ही आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्ती चे असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत... अश्या या अल्पवयीन मुलीची आत्महत्या ही समाजमनाला वेदना देणारी आहे व विकृत मनोवृत्ती ही कुठल्या थराला जात आहे याचे हे द्योतक आहे..!!
अश्या विकृत मनोवृत्तीच्या या दोन्ही नराधम आरोपीवर तातडीने आरोप निश्चिती करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागभीड तालुका भाजपा च्या वतीने करण्यात आली आहे..!!!
यावेळी पिडीत युवतीच्या घरी भाजपच्या वतीने सांत्वनपर भेट देण्यात आली...यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री व जिल्हा परिषद सदस्य संजयजी गजपुरे,भाजपा तालुका अध्यक्ष संतोष रडके,श्रीमती इंदूताई आंबोरकर उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, नितुताई येरणे,अध्यक्ष भाजपा महिला आघाडी,नागभीड नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,नगरपरीषदेचे बांधकाम सभापती सचिन आकुलवार, नगरसेवक रुपेश गायकवाड,माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज कोहाट,भाजपा कार्यकर्ते अरविंद भुते यांची उपस्थिती होती..!
दिनचर्या न्युज