चंद्रपूरच्या महिला महापौर, शिल्पा बनपूरकर यांना न्याय देतील का?




चंद्रपूरच्या महिला महापौर, शिल्पा बनपूरकर यांना न्याय देतील का?

ओली बाळंतीण असताना शुध्दा पत्रकार परिषद घेण्याची नामुष्की!

चंद्रपूर दिनचर्या न्युज :-

महानगर पालिका चंद्रपूर मार्फत दि. २७/०७/२०२० ला नामे श्री प्रफुल तिलकचंद बनपुरकर यांचे पक्क्या वाल कंपाऊंडचे बांधकाम तोड़ल्यामुळे मा.सहआयुक्त पाटील साहेब यांनी आणि इतर कर्मचारी यांच्या मनमानीमुळे आणि सुळबुद्धीने बांधकाम तोडण्यात आले असून श्री.प्रफुल बनपुरकर आणि त्यांची पत्नी सौ. शिल्पा बनपूरकर यांनी डिजिटल मीडिया असोसिएशन'च्या प्रेस वार्ता लोक मध्ये सांगितले आहे.माझ्यावर परिवार. मनपाने हेतुपूर्वक माझ्या घराच्या वालकंपाऊड पाडले. वरून मलाच नाला
बाधन्यासाठी पैसे द्या असा उलट सल्ला मनपा कडून दिला. विनवणी करून सुद्धा माझ्या घरी कोणी नसताना, कुठलाही नोटीस न देता माझे १ लाख ६० हजार रू. आथिर्क नुकसान केले.मि
ओली बाळंतीण असून माझे छोटेशे बाळ आहे. असे सांगीतले असताना शुध्दा माझे काही न ऐकता मनपाने वालकंपाऊड पाडले.
त्याची भरपाई द्यावी अशी मागणी केली.
पत्रकार परिषदेत झालेल्या अन्यायाबाबत व्यथा व्यक्त करण्यात आली .
झालेल्या अन्यायाच्या संदर्भात - श्री. प्रफुल बनपुरकर यांनी मनपाच्या पूर्वी २०१८ ला झालेल्या नालीच्या बांधकामा नंतर सन २०१९
मध्ये वाल कंपाउंडचे अंदाजे 3, फूट जागा सोडून बांधकाम करण्यात आली आहे.
हे सर्व तोडण्यास प्रवृत्त करणाऱ्यांचे हल्ली घर सरकारी नालीवर असुन हि सुद्धा यांच्यावर कार्यवाही
करण्यात आलेली नाही.
मा. आयुक्त पाटील साहेब मा.न.पा. चंद्रपूर यांनी इतर पूर्वसूचना न देता किव्हा कोणताही नोटीस न
देता मनमानीने सुळबुद्धीने पक्के बांधकाम तोडण्यात आले आहेत. तोडफोड करतेवेळी घर मालक घरी हजर नसतांना आणि त्यांचे पत्नीला धमकावून जबरदस्तीने तोडण्यात आले आहे. सध्या त्यांच्या पत्नीचे नुकताच एक महिन्यापूरी बाळपण झाल्याने मानसिक तणाव वाढत आहे.
जनप्रतिनिधी म्हणून निवडून आलेली नगरसेविका सौ, नीलम आक्केवार मेंडम यांनी कोणत्याप्रकारची
दखल न घेता नगर सेविकांकडून नजर अंदाज करण्यात येत आहे असे लक्षात येत आहे. मा. पाटील  सहा आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांचे द्वारे पदाचा गैर वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. श्री बनपूरकर यांचे घराचे मौका पाहणी करून शासन प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन न्याय व अधिकार देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मनपा सह्या. आयुक्त पाटील यांचेवर कार्यवाही करून नुकसान भरपाई करण्यात यावे अशी सुद्धा मागणी
सौ. शिल्पा बनपूरकर, प्रफुल्ल बनपूरकर, शंकनाथ पेशने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

काय म्हणाले, सहाय्यक आयुक्त पाटील, तो नाला नैसर्गिक आहे. त्यानाल्यावर बनपूरकर यानी अतिक्रमण केले आहे. दहा पंधरा घरात पाणी घुसले. त्यालोकांनी मनपात तक्रार केली. मनपाकडू त्यांना तोंडी माहिती दिली की, दोन दिवसात तोडा!
असे सहाय्यक आयुक्त पाटील म्हणाले.