दोन नराधमांनी केला बलात्कार ,
असाह्य १६ वर्षीय युवतींनी केली आत्महत्या
दिनचर्या न्युज :-
नागभीड तालुक्यातील कसर्ला येथील १६ वर्षीय युवतीने काल दिनांक ७ ऑगस्टला दोन युवकांनी बलात्कार केल्याच्या कारणावरून विहिरीत उडी घेऊन सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केली. गावातीलच दोन नराधमांनी बलात्कार केल्याचे मृतक युवतीने लिहून ठेवलेल्या सुसाईट नोट मधे नमुद केले आहे. या सुसाईड नोट च्या आधारे पोलिसांनी दोन आरोपी युवकांना काल ( 7 ऑगस्ट ) रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, मृतक युवती ही नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती.तिला परीक्षेत ६१% एवढे गुण मिळाले होते. काल दिनांक ७ ऑगस्टला मृतक युवती पालकांच्या सांगण्यावरून स्वत:च्या शेतात गेली होती. तिची आई रोवणे सुरु असल्याने मजुरीला गेली होती. युवती दंडावर ( शेतावर ) जात असतांना आरोपी अजय नन्नावरे व मंगेश मगरे यांनी युवतीचा पाठलाग करून, शेतात जाऊन सदर युवतीवर रेप केला.हा अत्याचाराचा घाव युवतीच्या जिव्हारी लागल्यामुळे युवतीने सायंकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केली. तत्पूर्वी युवती घरी आली होती. घरून पेन व कागद घेऊन पुन्हा शेतात गेली. तिथे तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीत तिने ‘ गावातीलच अजय नन्नावरे व मंगेश मगरे यांनी माझ्यावर बलात्कार केला, त्यामुळे मी आत्महत्त्या करीत आहे,’ हे कारण लिहून ठेवले.
युवतीच्या पालकांनी सायंकाळी ६ वाजता घरी आल्यानंतर मुलगी घरी न दिसल्यामुळे मुलीचा शोध घेतला. अंधार पडल्याने गावातील दोन-तीन व्यक्ती सोबत घेऊन शेतावर शोधाशोध केली असता शेताच्या पाळीवर फावडा दिसला. फावड्याच्या खाली एका पाँलीथीनमध्ये चिठ्ठी दिसली . मृतक युवतीने चिठ्ठीत “मेरा मौत का कारण अजय नन्नावरे (22) व मंगेश मगरे (27) यांनी रेप केला, ” असे नमुद केले आहे.
मृतक मुलीच्या आईने नागभीड पोलीस स्टेशनला फोनद्वारे या घटनेची माहिती दिली व नागभीड पो.स्टे.ला जावून तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आज ८ ऑगस्टला शेताजवळील एका विहिरीत मृतक युवतीचे प्रेत मिळाले. प्रेत शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे हलविनण्यात आले. या घटनेचा तपास नागभीड पोलिस स्टेशनचे ठानेदार दिपक गोतमारे यांच्या मार्गदर्शनात ए. पी. आय. पुनम पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.बातमी पब्लिश होईपर्यंत युवतीचा शव विच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करतात, याची माहिती दिली जाईल.
दिनचर्या न्युज