जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासात 315 बाधितांची नोंद ; पाच बाधितांचा मृत्यू


बाधित कोरोनातून झाले बरे

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, गेल्या 24 तासात 315 बाधितांची नोंद ; पाच बाधितांचा मृत्यू

आतापर्यंतची बाधित संख्या 5568;

उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 2416
दिनचर्या न्युज
चंद्रपूर,दि.12 सप्टेंबर: जिल्ह्यात गेल्या 24 तासात 315 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 5 हजार 568 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 2 हजार 416 बाधित आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 86 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये अंचलेश्वर वॉर्ड चंद्रपुर येथील 63 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू वणी, यवतमाळ येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह हृदयविकाराचा आजार असल्याने 12 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू झरी जामणी यवतमाळ येथील 48 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू घुटकाळा तलाव चंद्रपूर येथील 54 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. 8 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 11 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तर, पाचवा मृत्यू जटपुरा गेट, चंद्रपूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 66 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 60, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन,यवतमाळ दोन बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात सर्वाधिक कोरोना बाधित पुढे आले आहेत. 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर व परिसरातील शहरातील 179, चिमूर तालुक्यातील 3, पोंभूर्णा तालुक्यातील 1, बल्लारपूर तालुक्यातील 29, ब्रह्मपुरी तालुक्यातील 8, भद्रावती तालुक्यातील 13, मूल तालुक्यातील 13, राजुरा तालुक्यातील 13, वरोरा तालुक्यातील 19, सावली तालुक्यातील 4, सिंदेवाही तालुक्यातील 4, कोरपणा तालुक्यातील 10, गोंडपिपरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील 5, यवतमाळ जिल्ह्यातील 3, भंडारा व वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 315 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.