पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे यांचे निधन

पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे यांचे निधन


पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे यांचे निधन

चंद्रपूर(दिनचर्या न्युज ) :
चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे पडोली पंचायत समिती क्षेत्राचे सदस्य प्रेमज्योत विश्वनाथ चिवंडे (वय 34) यांचे आज सकाळी अचानक निधन झाल्याने चंद्रपूरातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे पडोली पंचायत समिती सदस्य प्रेमज्योत चिवंडे दाताला निवासी यांना मागील आठवड्यापासून कोरोना साधर्म्य लक्षणें दिसू लागल्यानंर प्रथमोपचार घेत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली.
दोन्ही तपासण्यांमध्ये अहवाल नेगेटिव्ह आला परंतु काल अचानक त्रास जाणवू लागल्याने चंद्रपुरातील कोतपल्लीवार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी न्यूमोनिया चे निदान केल्यानंतर उपचार सुरु असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा आप्तपरिवार आहे.