माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, महापौर यांचे आवाहन



माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेकरिता नागरिकांनी सहकार्य करावे, महापौर यांचे आवाहन

दिनचर्या न्युज
चंद्रपूर : कोविड - 19 नियंत्रणासाठी तसेच मृत्यू जर कमी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कोरोना मुक्त महाराष्ट्र मोहिमेत सामील होण्याचे आव्हान चंद्रपूर महानगरपालिका यांचेकडून आज पत्रकार परिषद करण्यात आले आहे.
चंद्रपूर शहराची मागील दोन आठवड्यातील वाढती कोविड-19 बाधितांची संख्या लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या नियंत्रणासाठी स्वतः जनतेनी सहभागातून सहकार्य करण्याचे आव्हान महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते साहेब, महापौर राखीताई कंचर्लावार , उपमहापौर राहुल पावडे ,
सभागृह नेते वसंत देशमुख, गट नेते सुरेश पचारे गट नेते पप्पू देशमुख या योजनेचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे,यांची उपस्थिती होती.
या वेळी बोलताना आयुक्त राजेश मोहीते म्हणाले की, या मोहिमेतून लक्षणे असणारी व्यक्ती शोधली जाईल व त्यांना तात्काळ तपासणी करून बाधित आहेत की नाही याची खात्री केली जाईल. या मुळे पुढील संसर्ग टाळता येईल. या मोहिमेतून गृह अलगीकरण असणारे बाधित व कोविड मुक्त झालेले बाधित यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी या बाबत माहिती दिली जाणार आहे. या मोहिमेकरिता दोन सदस्य असलेले 111 पथकाची स्थापना केली आहे.
दिनांक 15 /9 /2020 पासून मोहिमे संदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक बाबी कळविण्यात आले आहे.  त्यात  गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथक,  एक आरोग्य कर्मचारी दोन स्थानिक लोकप्रतिनिधी स्वयंसेवक असतील.  एक पथक पन्नास घरांना भेट देतील.  भेटीदरम्यान सर्व सदस्याचे तापमानSpO2 तपासणार आहेत
सर्व ठिमला सहकार्य करावे असे आव्हान मनपा प्रशासन कडून करण्यात आले आहे.