नाभिक समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना , महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने निवेदन!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. नाभिक समाजातील कोरोना काळात सर्वच नाभिक समाज बांधवांवर दुर्दैवी संकट ओढवले गेले आहेत.
कोरोना महामारिच्या काळात गेल्या मागील पाच महिन्यात सर्वात मोठे संकट नाभिक समाजावर आलेले आहे. आता पर्यंत नाभिक समाजातील 16 युवकांनी आत्महत्या केलेल्या असून नाभिक व्यवसाय २५ % वर येऊन ठेपला आहे. नाभिक समाज उपासमारी ला तोंड देत असतांना सुद्धा सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारे झालेल्या बदनामी ला सामोरे जात आहे.
अश्या परिस्थिति मधे नाभिक समाजाने शासनाला अनेक निवेदने दिलेली आहेत. तरी शासनाने नाभिक समाजाच्या निवेदनाची कुठलीच दखल घेतलेली नाही. तसेच आत्महत्या ग्रस्त कुटुंबा बद्दल शासनाने घेतलेल्या असंवेदनशीलतेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत.
करिता आपणास या पत्रकाद्वारे निवेदन देण्यात येत आहे की, १५ दिवसाचे आत खालील मागन्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा व नाभिक समाजाला न्याय द्यावा. जर आपन आमच्या मागन्यांना न्याय दिला नाही तर सम्पूर्ण राज्य भर आम्ही तीव्र आन्दोलनाची भूमिका घेऊ व त्यामुळे जर राज्यात तनावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहिल.
आत्महत्या ग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी १० लाख रूपयाची मद्त करण्यात यावी.
२६ मार्च १९७९ रोजी राज्य शासनाने केंद्र सरकार ला केलेल्या शिफ़ारसी नुसार नाभिक समाजाला अनुसूचित जाति मधे समाविष्ट करण्यात यावे.
लॉक डाउन सुरु झाल्यापासुन सलून व्यावसाइकाला दरमहा १०,०००/- रु. मद्त मिळावी.
सलून व्यावसाइकांना ५० लाख रु. विमा सरंक्षण देण्यात यावे.
सलून व्यावसाइकांचे लॉक डाउन मधील विज बिल माफ करण्यात यावे.
सलून व्यावसाइकांना संपूर्ण काम करण्यास परवानगी द्यावी.या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाअध्यक्ष दिनेश एकवनकर यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष माणिकचंद चन्ने, शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, प्रेम ज्योती नाभिक महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सरोजताई चांदेकर, ओबीसी महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्यामभाऊ राजूरकर, जिल्हासचिव उमेश नक्षीने, बंटी कडवे, कृणाल कडवे, विशाल कडवे यांच्यासह महाराष्ट्र नाभिक महामंडळचे सदस्य यांची उपस्थिती होती.