पुरपरिस्‍थीतीदरम्‍यान सरकारचे अस्‍तीत्‍व नाही असे चित्र – देवेंद्र फडणवीस
पुरपरिस्‍थीतीदरम्‍यान सरकारचे अस्‍तीत्‍व नाही असे चित्र – देवेंद्र फडणवीस

*चंद्रपूर जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन पुरग्रस्‍त भागात 40 हजार टन चारा वितरीत करणार – आ. सुधीर मुनगंटीवार*

*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुरग्रस्‍त भागाचा पाहणी दौरा*

दिनचर्या न्युज :-

विदर्भातील 5 जिल्‍हयांमध्‍ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पुरग्रस्‍त भागात आम्‍ही पाहणी दौरा केला. शेतक-यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे, घरे पूर्णपणे नष्‍ट झाली आहेत, गोठे नष्‍ट झाले आहेत, जनावरे वाहून गेली आहे. मात्र सरकारचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पुरग्रस्‍तांना तातडीची मदत नाही, रेशन नाही, तात्‍पुरते निवारे नाही. मुळात या पुरपरिस्‍थीतीदरम्‍यान सरकारचे अस्‍तीतत्‍व नाही असे चित्र दिसत आहे. 2019 मध्‍ये अवकाळी पावसामुळे झालेल्‍या नुकसानादरम्‍यान उध्‍दव ठाकरे बांधावर गेले आणि 25 हजार रू. हेक्‍टरी मदत द्या अशी मागणी त्‍यांनी केली होती. मात्र आज सरकारमध्‍ये आले आणि पुरग्रस्‍तांना मदत देण्‍यासाठी अजून साधी घोषणा सुध्‍दा केली नाही. शासनाने त्‍वरीत पुरग्रस्‍तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 29 ऑगस्‍ट 2019 च्‍या शासन निर्णयातील मदती संबंधीच्‍या तरतूदी तातडीने लागू करण्‍याची मागणी देखील त्‍यांनी यावेळी केली.

दिनांक 3 सप्‍टेंबर रोजी ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील काही पुरग्रस्‍त गावांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेटी देत पाहणी दौरा केला. यावेळी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन जनावरांसाठी 40 हजार टन चारा वितरीत करण्‍याची घोषणा केली. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे पंचनामे करण्‍याची पध्‍दत वेळकाढू असते, त्‍यामुळे या पंचनाम्‍याच्‍या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्‍यासाठी व पुरग्रस्‍तांना योग्‍य न्‍याय मिळावा यासाठी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील, असेही त्‍यांनी जाहीर केले. पुरग्रस्‍त गावांमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन त्‍वरीत निर्जंतुकीकरणाची कामे हाती घेण्‍यात येईल तसेच बोअरवेल दुरूस्‍तीसाठी त्‍वरीत पथक पाठविण्‍यात येईल, असेही त्‍यांनी यावेळी जाहीर केले.
*जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी पंचायत समिती ब्रम्‍हपूरी येथे घेतली आढावा बैठक*
यादरम्‍यान पंचायत समिती ब्रम्‍हपूरी येथे जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनी अधिका-यांची आढावा बैठक घेतली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्‍या निर्देशानुसार तातडीने तातडीने जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन पुरग्रस्‍त भागात मदतकार्य मोहीम राबविण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांनी अधिका-यांना सूचना दिल्‍या. यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा ईशारा त्‍यांनी यावेळी दिला. या दौ-या दरम्‍यान पंचायत समिती ब्रम्‍हपूरीचे सभापती रामलाल दोनाडकर, भाजपा ब्रम्‍हपूरी शहर सचिव मनोज वठे, अरविंद नंदूरकर, मनोज भुपाल, प्राचार्य सुयोग बाळबुधे, जिल्‍हा परिषद सदस्‍या दिपाली मेश्राम, तनय देशकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.