24 तासात 137 नवीन बाधित; दोन बाधितांचा मृत्यू,जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 13082 वर
जिल्ह्यात आतापर्यंत 9883 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3002

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 13082 वर

24 तासात 137 नवीन बाधित; दोन बाधितांचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 16 ऑक्टोबर :जिल्ह्यात गेल्या 24 तासात 137 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 13 हजार 82 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 9 हजार 883 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार दोन बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार,जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये कोलगाव, वणी यवतमाळ येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 12 ऑक्टोबरला श्वेता हॉस्पिटल,चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तर दुसरा मृत्यु, हनुमान नगर तुकुम, चंद्रपूर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधितेला 14 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल, चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया व मधुमेहाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 197 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 187, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ चार आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 32 बाधित, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील दोन, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 28 , गोंडपिपरी तालुक्यातील दोन, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्‍यातील 23, वरोरा तालुक्यातील 13, भद्रावती तालुक्यातील 12, सावली तालुक्यातील दोन, सिंदेवाही तालुक्यातील सहा, राजुरा तालुक्यातील तीन, गडचिरोली येथील दोन तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 137 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील गुरुद्वारा रोड तुकूम, इंदिरानगर, श्यामनगर, बंगाली कॅम्प परिसर, अष्टभुजा, स्वावलंबी नगर, मोरवा ताडाळी, गंज वार्ड, जटपुरा गेट परिसर, जगन्नाथ बाबा नगर, महाकाली कॉलरी, वैद्य नगर,घुटकाळा वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील अशोक वार्ड विसापूर, बामणी भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील जवाहर नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील बोर्डा, अभ्यंकर वार्ड, एकोना, गजानन नगर, आनंदवन, जळका, एकार्जूना, सरदार पटेल वार्ड, राम मंदिर वार्ड, सिद्धार्थ वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील रेणुका माता वार्ड, झाशी राणी वार्ड,कालेता, टिळक नगर,नान्होरी, विद्यानगर, सुंदर नगर,मेढंकी परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द, सरदार पटेल वार्ड, शिवाजीनगर, पिपरबोडी,परिसरातून बाधित ठरले आहे.

सावली तालुक्यातील चक पिरंजी,भागातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, रत्नापूर भागातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील सावरगाव, नवेगाव पांडव, जनकापूर, नवखेडा, राम मंदिर परिसर, मंगरूळ, वैजापूर, गिरगाव, गांधी चौक परिसर, पळसगाव जाट परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील परडपार,भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील जुनासुर्ला, चिरोली, सावंगी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

दिनचर्या न्युज