उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपुर कर्मचा-यांनी सोमवारी पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे सामुहीक मुंडण आंदोलन

उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपुर कर्मचा-यांनी सोमवारी पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे सामुहीक मुंडण आंदोलन

उमेद कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना केसदान (सामुहीक मुंडण)

दिनचर्या न्युज :-
ब्रम्हपुरी दि. 06/10/2020, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुर्नियुक्ती देऊ नये.असे काढण्यात आलेले पत्र तातकाळ रद्द करावे. या प्रमुख मागणीसाठी उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपुर कर्मचा-यांनी सोमवारी पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे सामुहीक मुंडण आंदोलन केले.
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 45 लाख कुटूंबांचे आधारवड ठरलेला केंद्र पुरस्कृत उमेद अभियानाच्या अमलबजावणीत कुठलाही बदल करु नये तसेच चुकीचे आकलन करुन कर्मचाऱ्याच्या सेवेचे खाजगीकरण करण्याचा मनसुबा हानुन पाडण्यासाठी चंद्रपुर जिल्हातील कंत्राटी कर्मचारी सामुहीक मुंडण करुन मा. मुख्यमंत्री साहेब यांना केस पाठविणार.
अभियानात कार्यरत विषयतज्ञामुळे सामाजीक उत्थानाचे कार्य करीत आहे. ग्रामस्थरा पर्यंत वंचीत घटकाची क्षमतावृध्दी हा अभियानाचा गाभा असुन त्यासाठी जागतीक बँक, केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्यावसायीक मनुष्यबळाची निर्मीती करण्यात आली असुन मनुष्यबळ विकास मार्गदर्शीकेनुसार अभियानाचे काम सुरु होते.
तथापी दिनांक 10/09/2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी अत्यंत अविवेकी निर्णय घेतला असुन मागील अनेक वर्षापासुन कंत्राटी पध्दतीने कार्यरत कर्मचारी यांना पुर्णनियुक्ती न देण्याचे पत्र जारी केले आहे. सदर निर्णय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानवी हक्क डावलनारा लोक-कल्याणकारी अभियान संपविण्याचा घाट आहे.
त्यामुळे चंद्रपुर जिल्हातील उमेद कर्मचारी कल्याण मंडळ चंद्रपुर चे कर्मचारी यांनी सामुहीक मुंडण करुन मातोश्रीवर केस दान करणार आहेत.
येणाऱ्या काळात सदर शासन परिपत्रक मागे न घेतल्यास गावस्तरीय समुदाय संसाधन व्यक्ती (प्रेरीका) यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
सदर सामुहीक मुंडण कार्यक्रमामध्ये उमेद कर्मचारी कल्याणा मंडळाचे अध्यक्ष-श्री. प्रविण भांडारकर , सचिव- संतोष वाढई, तसेच सदस्य श्री. मोहित नैताम, श्री.विवेक नागरे, श्री. दिनेश जांभुळकर, श्री. आर. राऊत, श्री. अमिर पठाण, श्री. उध्दव मडावी, कु. संगिता शिंदे , कु. ज्योती साळवे, श्री. हेमचंद बोरकर, कु. गोपीका येटे, कु. सविता ऊईके, श्री. रीतेश मारोतवार, सिध्दार्थ ढोणे, श्री. दिपक गायकवाड, श्री. प्रविण सायंकार , श्री. शरद मसराम व इतर सदस्य उपस्थित होते.