चंद्रपूर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे शिवरक्षक जिवाजी महाले यांची जयंती संपन्न!चंद्रपूर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे शिवरक्षक जिवाजी महाले यांची जयंती संपन्न!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर तर्फे दिनांक 9/10 /2020 ला शिवाजी चौक येते शिवरत्न सुरविर जिवाजी महाले यांची जयंती जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या प्रमुख अतिथी शिवसेना उपशहर प्रमुख हर्षद कानमंपल्लीवार, यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला ,पुष्पगुच्छ, पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ओबीसी बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम भाऊ राजूरकर यांनी सूर वीर जिवाजी महाले ज्यांच्या यशोगाथा संबंधात मनोगत व्यक्त केले.'' होता जीवा म्हणून वाचला शिवा" अशा थोर महान यौद्धाला कोटी कोटी नमन.! महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष संदेश चल्लीरवार, उपाध्यक्ष कृणाल कडवे, सुनील कडवे, अविनाश मांडवकर, सतीश मांडवकर, ओम प्रकाश नक्षीने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात आली.