पालकमंत्री, विविध विभागाच्या विकास कामांचा घेणार आढावा

पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार 1 ते 3 नोव्हेंबर रोजी

चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

विविध विभागाच्या विकास कामांचा घेणार आढावा

दिनचर्या न्युज


चंद्रपूर, दि. 31 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 1 ते 3 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे नागपूरहुन आगमन व राखीव. सकाळी 10:45 वाजता ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीस उपस्थित. सायंकाळी 4:30 वाजता ब्रह्मपुरी मल्टीसिटी अर्बन निधी लिमिटेड, ब्रह्मपुरी शाखेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5:00 वाजता ब्रह्मपुरीवरून गडचिरोली कडे प्रयाण करतील.

दि.2 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10:00 वाजता गडचिरोली वरून व्याहाड (बु.) ता. सावली जि.चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रव्याहाड (बु.) येथे नवीन इमारतीचे भूमिपूजन करतील. सकाळी 10:45 वाजता सामदा (बु) येथे स्व.रुपेश प्रभाकर बुरलेसोनापूर येथे स्व. दिवाकरजी भुरसेलोंढोली येथे स्व. रवींद्र बोधलकर यांच्या कुटुंबीयांस सांत्वनपर भेट देतील. दुपारी 12:00 वाजता तहसील कार्यालयसावली येथे आगमन व कोरोना विषाणू संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील.

दुपारी 12:30 वाजता तहसील कार्यालयसावली येथे तालुकास्तरीय विकास कामांसंदर्भात सर्व विभागासमवेत आढावा बैठक घेतील. दुपारी 1:30 वाजता सिंचाई विभागाचे विश्रामगृह सावली येथे सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीस उपस्थिती तसेच नगरसेवकांसमवेत चर्चा करतील. दुपारी 2:30 वाजता सावली वरून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. दुपारी 3:30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4:30 वाजता अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामासंदर्भात कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्यासमवेत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5:30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे कोविड-19 बाबत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 7:00 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगरचंद्रपूर येथे आगमनराखीव तथा मुक्काम राहतील.

दिनांक 3 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी 11:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे पिक विमा कंपनीकृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीसिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास कामासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील.

दुपारी 1:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतील. दुपारी 2:00 ते 2:30 वाजताची वेळ राखीव असणार आहे. दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्य प्राण्यांद्वारे होत असलेले हल्ले व वनहक्क दाव्यांबाबत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5:30 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील.