कामठी येथे सलून व्यवसायीकाच्या हत्येचा निषेध, कठोर कार्यवाईची मागणी!





कामठी येथे सलून व्यवसायीकाच्या हत्येचा निषेध, कठोर कार्यवाईची मागणी!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :
कोरोना काळात पहीलेच नाभिक समाज विविध समस्यांनी ग्रासला आहे.यातच नागपूर,कामठी येथील खलाशी लाईन परीसरात नाभिक व्यवसाय करणारे सुदेश हंसराज थुले -५८ वर्ष यांची हत्या करण्यात आली. महाराष्टर्् नाभिक महामंडळ शाखा चंद्रपूरच्या वतीने जाहीर निषेद करित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी .नाभिक समाजाला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यावतीने मा. मुख्यमुत्री यांना जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर यांच्या नेत्तृत्वात देण्यात आले आहे. नाभिक समाज हा पांरपारीक व्यवसाय करून आपली उपजिविका करतो.या करिता त्याला आपल्या व्यवसायाकरीता तिष्ण साहीत्याचा वापर करावा लागतो. मनूष्याच्या संमधीत सर्व व्यावसाय असून नागरीकाना सेवा देणे आमचे कर्तव्य आहे.परंतू गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकामुळे नाभिक समाज त्रस्त आहेत.निदोष व्यवसायावर हल्ले करण्यात येत आहे.
दिनांक २५ सप्टेंबरला कामठी येथिल सुदेश हंसराज थुले या नाभिक व्यवसायकांची हत्या करण्यात आली. यामुळे समाजात भितीचे वातावरण आहे..
हत्या करणा-यावर कठोर कारवाई करावी.,त्याचे कुठूंबाला आर्थिक मदत व एका सदस्याला शासकीय नौकरी दण्यात यावी.नाभिक समाजाला सुरक्षा देण्यात यावी.अ‍ॅल्टड्ढासिटी कायदा लागू करावा ,अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर ,कार्याध्यक्ष मानिकराव चन्ने, सल्लागार शाम राजूरकर, उपाध्यक्ष सूनिल कडवे, शहरध्यक्षसंदेश चल्लीरवार, अविनााश मांडवकर, प्रविण कोंडस्कर  जेष्ट मार्गदर्शक वसंता बडवाईक, प्रेम ज्योती नाभिक महीला मंडळाच्या अघ्यक्षा सरोज चांदेकर, तसेच महीला, नाभिक महामंडळ, समाजातील नागरीकांची उपस्थिती होती.

दिनचर्या न्युज