दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर येथे संविधान दिनी दि 26 नोव्हें 2020 ला आयोजित ओबीसी विशाल मोर्चाचे अनुषंगाने शहरात जनजागरण करण्यासाठी दुपारी 2 वा डॉ आंबेडकर कॉलेज, दिक्षाभूमी चंद्रपूर येथून विशाल बाईक रॅली काढण्यात आली. जय ओबीसी, जय संविधान, देख लेना आँखोंसे, हम आयेंगे लाखोंसे! या घोषणा देत चंद्रपूर शहरात शेकडोंच्या संख्येने आज बाईक राँली काढण्यात आली. ओबीसी घटकातील सर्वच जातीतील लोकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.
रॅलीला ऍड. पुरुषोत्तम सातपुते, ऍड. दत्ताभाऊ हजारें, ऍड. फरहाद बेग, सूर्यकांत खनके, बळीराज धोटे, डॉ राकेश गावतुरे, डॉ सुरेश महाकुलकर, प्रा. विजय बदखल, सतीश मालेकर ऍड. प्रशांत सोनुले, यानी झेंडा दाखवून रॅलीची सुरवात केली. रॅली जुना वरोरा नाका चौक, जनता कॉलेज, वडगाव रोड चौक, उड्डाणपूल, तुकूम, गुरुद्वारा रोड, बंगाली कॅम्प, एसटी स्टॅन्ड, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड मार्गे अंचलेश्वर गेट, भिवापूर, परत अंचलेश्वर गेट कस्तुरबा चौक, समाधी वार्ड मार्गे, पठाणपुरा गेट, गांधी चौक, जटपुरा गेट, रामनगर मार्गे, चांदा क्लब ग्राउंड ला समारोप करण्यात आला.
या प्रसंगी बळीराज धोटे, डॉ राकेश गावतुरे, डॉ अभिलाषा गावतुरे, ऍड. प्रशांत सोनुले ई नी मार्गदर्शन करून 26 नोव्हें च्या ओबीसी विशाल मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे प्रयत्न करावे असे आवाहन केले.