सीएमईजीपी योजनेतील भोंगळ कारभार, अधिकारी व दलाल मालामाल!
सीएमईजीपी योजनेतील भोंगळ कारभार, अधिकारी व दलाल मालामाल!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील बेरोजगार-यांना व्हावा यासाठी राज्य सरकारने सीएमईजीपी, म्हणजे चिप मिनिस्टर एम्पायमेंट जनरेशन प्रोग्राम हि योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून शुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज अनुदानित तत्वावर पुरवठा करणे यासाठी जिल्ह्यातील बेरोजगार व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण असताना मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील युवकांना एम सी डी
कडून बेरोजगारीचा नावावर उधळपट्टी सुरू आहे.
या कार्यालया मार्फत बेरोजगारांना 10 दिवस प्रशिक्षण दिले जाते.
यासाठी डिआयसी मार्फत लाभार्थ्यांना रोजगारासाठी कर्ज अनुदान तत्वावर मिळण्यासाठी अर्ज दाखल केला जातो. याचे प्रशिक्षण एम सीडीच्या द्वारे दिले जाते. मात्र अनेक वेळा गरजू बेरोजगारांना डावलून प्रशिक्षण झालेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातही नियमा प्रमाणे मॅनेफाँक्चर दहा दिवसाचे प्रशिक्षण असताना किंवा नियमाप्रमाणे प्रशिक्षण सर्विस सेक्टर 6 दिवस असते. ते फक्त पाच दिवसात आटोपून बाकी सर्व कागदी घोडे रंगविले जातात.
यात प्रशिक्षण लाभार्थी 50 /सहभागी बेरोजगार नसून ज्यांचे उधोग सुरू आहे त्यांनाच कर्ज वाटप झाले आहेत, याची उच्च स्तरावर चौकशी केली तर अनेक गबाळ बाहेर येण्याची शक्यता आहे.
एकाच व्यक्तीला वारंवार शासनाच्या... उधोजकताना प्रशिक्षण देण्यात आले. हा कार्यक्रम सरकारी खर्चाने घेतल्यावर पुन्हा प्रशिक्षण करण्याची गरज नाही. तरी त्याच लाभार्थ्यांचा नावाचा पुन्हा पुन्हा वापर करून
कर्ज पुरवठा केल्याचा भोंगळ कारभार सुरू आहे.
डिआयसी, खादी ग्रामोद्योग, एम सी डी या विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे दलालांना 
हाताशी धरून बेरोजगार युवकांना दलाल आपल्या स्वार्थासाठी सक्रिय झाले आहे.यात मात्र अधिकारी व दलाल मालामाल झाले आहेत. प्रकल्प अहवाल प्राप्त करण्यासाठी ते कर्ज मंजूरी प्रकरणात दलाल यांच्या सहभाग असतो. त्यामुळे या कार्यालयात होत असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी अशी मागणी काही बेरोजगारांकडून होत आहे.