दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर ६ डिसेंबर - स्वच्छ सर्वेक्षण 2021 या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानात चंद्रपूर शहर महानगरपालिका झोन क. 3 ब येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वच्छता अँपसंबंधी प्रशिक्षण शिबीर तसेच नागरीकांच्या सहभागातुन बाबुपेठ येथील बीपीआर गार्डनची स्वच्छता करण्यात आली.
मनपातर्फे ओडीएफ ++ व कचरामुक्त शहर (GFC) करिता विविध जनजागृती कार्यकम घेण्यात येत आहेत. सफाई कामगार, नाली सफाई कामगार, घंटागाडी कामगार व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्यात येत आहे. झोन क. 3 ब येथे २६ तारखेला सकाळी ७ वाजता झालेल्या कर्मचारी प्रशिक्षण शिबिरात स्वच्छता अँप अँक्टीवेशन करणे, त्याचा वापर करणे, नागरीकांकडुन येणाऱ्या तकारींचे निवारण करणे, शहर स्वच्छता, कोविड -19 तसेच शहर निरोगी ठेवतांना स्वतःच्या आरोग्याबाबत कशी काळजी घावी, ओला सुका कचरा वेगळा करून घेणे, कचऱ्याचे प्रकार इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच २७ डिसेंबर दुपारी १ वाजता लोकसहभागातुन बाबुपेठ येथील बीपीआर गार्डनची स्वच्छता करण्यात आली. उपस्थित नागरीक, स्वच्छता निरिक्षक, सफाई कामगार व इतर यांनी शहराच्या स्वच्छतेबाबत आपली जबाबदारी पार पाडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री. हजारे व स्वच्छता निरीक्षक श्री. अनिरुद्ध राजूरकर उपस्थीत होते.