वसंत फुलावा म्हणून नेत्यांची मनधरणी, अनेकांचे सातत्याने फोन!

वसंत फुलावा म्हणून नेत्यांची मनधरणी, अनेकांचे
सातत्याने फोन!

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वसंत देशमुख यांना मनधरणी करण्याचे प्रयत्न .

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महानगरपालिकेच्या सभापती पदावरून जन आक्रोश लक्षात घेता व वसंत देशमुख यांच्यावर खरोखरच अन्याय झाला हे सुधीर मुनगंटीवार यांच्या चांगलेच लक्षात आले . ते काल पासून सातत्याने वसंत देशमुख यांना फोनवर फोन करीत असून वसंत देशमुख त्यांचा फोन उचलत नसल्याने सुधीर मुनगंटीवार खुप अस्वस्थ दिसत असल्याचे विश्वसनीय सुत्रांच्या अनुषंगाने बोलल्या जात आहे .
सुधीर मुनगंटीवार यांची अस्वस्थता इतक्यावर गेली आहे की , त्यांचा फोन वसंत देशमुख उचलत नसल्याचे बघून त्यांच्या कार चालकाच्या मोबाईल वरून सुद्धा ते फोन लावत आहे .
सुधीर मुनगंटीवार यांना इतकेच शर्तीचे प्रयत्न करायची वेळ का म्हणून आली .यावरून हेच सिद्ध होते की , वसंत देशमुख ह्या निष्ठावान जबाबदार कार्यकर्त्याला त्यांनी कुठे गमावले तर नाही ना असे ही सूचक संकेत लक्षात येतात .
भाऊ काय चुकल होत वसंताच? त्याचा कडून आपण गट नेते पदाचा राजीनामा घेतला. सभापती पद देतो म्हणून, ते पद पण अल्पसंख्यांकांच्या गळ्यात घातल!
आणि आता वसंत फुलावा म्हणून त्याचे मनधरणी सुरू आहे. "भाऊ रान जळते तेव्हा, सर्व जग पहाते, मन जळते तेव्हा?..!
कोठलेही पद दिले नसते तरी चाल असत. पण! आपण तर त्याचा पाठित खंजीर खुपसला,! याचे शल्य काय असते, आपल्याला चांगले माहीत आहे. एखाद्याचा नाथाभाऊ करावा, पण! असा विश्वास घात करता कामा नये. यामुळे आपलेच सच्चे, विश्वासाचे निष्ठावान कार्यकर्ते दुरापास्त होतील यात काळी मात्र शंका नाही.
एकंदरित काय तर सुधीर मुनगंटीवार यानी वसंत देशमुख यांची मनधरणीच्या प्रयत्नासाठी त्यांच्या घरी तर जाणार नाही ना? असाही अंदाज बांधायला हरकत नाही .पण अशी वेळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये आपली ओळख निर्माण करणारे मुनगंटीवारावर मनधरणीची अशी वेळ यावी याचा अर्थ काय ?