पक्षाने केला निष्ठावान वसंत देशमुख यांचा अपमान, मि एक वास्तववादी मंचने पत्रकार परिषदेत केला आरोप
पक्षाने केला निष्ठावान वसंत देशमुख यांचा अपमान, मि एक वास्तववादी मंचने पत्रकार परिषदेत केला आरोप

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर महानगरपालिका सभापती पदावरून वसंत देशमुख यांच्यावर हेतुपुरस्सर केलेल्या
अन्यायाबाबत चंद्रपूर करांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे , कारण चंद्रपूर महानगरपालिकेवर वसंत देशमुख यांनी सातत्याने भाजपचा किल्ला लढविला पक्षाचा महापौर असो की सभापती कसा बसेल यासाठी जिवाचे रान केले होते .
वसंत देशमुख हे असे नगरसेवक आहे जे गेल्या 30 वर्षापासून सातत्याने निवडून येत आहे .व त्यांचा सर्व समाजामध्ये चाहता वर्ग आहे .म्हणून त्यांच्या नावाचा विचार पक्ष श्रेष्ठींनी घ्यावा असे सर्व स्तरावरून बोलल्या जात होते .खरे पाहता पक्षांनी त्यांच्या नावाचा याआधीच विचार करायला हवा होता .पण तसे झाले नव्हते .आणी तरीही वसंत देशमुख हे कधीही पक्षाकडे आपली वर्णी लागावी म्हणून प्रयत्नशील राहिले नव्हते .पण ह्यावेळी पक्ष श्रेष्ठीतर्फे त्यांच्याकडून जेव्हा सभागृह नेते पदाचा राजीनामा घेण्यात आला व त्यांच्या नावाला स्थाई समितीमध्ये क्रमांक 1 वर ठेवण्याचे आदेश देत शुभेच्छा दिल्या गेल्या तेव्हा मात्र चंद्रपूरकरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते .व सर्व स्तरावरून वसंत देशमुख हेच सभापती होतील हे जवळपास निश्चित असे वक्तव्य चालू असताना .ऐन नामांकन अर्ज दाखल करते वेळी पर्यंत त्यांना अंधारात ठेऊन एक अल्प संख्याक व केवळ 5 ते 8 मतांनी निवडून येणाऱ्या रवि आसवानीला सभापती पदाचे नामांकन दाखल करण्यासाठी पुढे करण्यात आले तेव्हा मात्र वसंत देशमुख यांचा हेतुपुरस्सर पक्षश्रेष्ठींनी घात केला हे स्पष्ट होते .एकतर पक्षाने त्याच्या कडून गट नेते पदाचा राजीनामा घेतला, कि तुला स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी देण्यात येत आहे म्हणून त्याला गप्पलतीत ठेवून त्याचे एवढे दिवस पक्षात काम केलाचे प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या एकप्रकारे अपमान केला गेला. त्यामुळे आज वार्डातील मि एक वास्तववादी मंचने पत्रकार परिषद घेऊन आपला रोष व्यक्त केला.
यावेळी भोला मडावी, मुन्ना नगरकर, प्रकाश निबृड, पुरुषोत्तम सुनटेवार, इम्रान शेख, पोतराजे, तसेच वार्डातील नागरिकांच
उपस्थिती होती.
झालेल्या अपमानाने चंद्रपूरकरांची घोर निराशा झाली .कारण वसंत देशमुख हा चंद्रपूर महानगराचा चेहरा असल्याने त्यांचा मान हा जनतेचा मान होता .व त्यांचा झालेला अपमान हा न विसरता येणारा अपमान असल्याने भाजप पक्षाला महानगरपालिकेत येणाऱ्या काळात जागा दाखविल्या जाईल असा निर्धार जनतेनी केलेला आहे .
वसंत देशमुख मुळेच भाजप आजपर्यंत महानगरपालिकेत आपली सत्ता टिकविण्यात समर्थ राहिला .त्यांचा जर अभ्यास केला तर ते निवडणूकी दरम्यान लोकांचा प्रतिनिधी म्हणूनच मैदानात उतरतात व पाच वर्षे लोकांच्या संपर्कात राहुन आपली जबाबदारी पेलवत असल्यामुळे निवडून येतात .त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी तन मन धनाने सोबत असतात तिथे कुठल्या जाती धर्माचे गणित लागू पडत नाही व ते जनतेच्या प्रेमापोटी सहज निवडून येतात .
अशा ह्या हिऱ्यावर त्यांच्या पक्षाकडून अशी वाईट वागणूक दिली जात असेल तर जनता त्या पक्षाला कशी माफ करणार ? म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेनी घेतलेल्या शपथेचे मत जाहिर करण्यात येत आहे व पक्ष श्रेष्ठींनी असे का म्हणून केले असा सवाल ही करण्यात येत आहे .पक्ष श्रेष्ठींनी उत्तर दिलेच पाहिजे अशी आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी करतो व बहुजन समाजाच्या नेत्याचे खच्ची करण कराल तर तुमच्या पक्षाला योग्य जागा दाखवू असे संकेत ही देत आहे .

दिनचर्या न्युज