महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा




महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा

जातीने लक्ष घालून शासनाच्या वतीने पुढील निर्णय लवकरच जाहीर...

दिनचर्या न्युज :-
मुंबई :-
दि.१८ फेब्रुवारी २०२१ रोजी *मा.श्री. कल्याणराव दळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य बलुतेदार महासंघाच्या विविध मागण्यासंदर्भात मा.विजय वडेट्टीवार कॅबिनेट मंत्री (इतर मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमीन विकास, भुकंप व पुनर्वसन खाते) यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली.महाराष्ट्र राज्य बलुतेदार महसंघाच्या शिष्टमंडळाला माननीय मंत्री महोदयांनी देखील स्वत: जातीने बलुतेदार महासंघाच्या प्रत्येक मागणीबाबत सविस्तरपणे शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. सर्व मागण्या विचारात लक्षात घेऊन लवकरच शासनाच्या वतीने पुढील निर्णय जाहीर केले जातील असे सांगितले.

१) बारा बलुतेदारांचा आर्थिक दर्जा उंच व्हावा यासाठी *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* लवकरच घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेत.

२) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* करिता २०२१-२२ या आर्थिक वर्षातील *अंदाज-पत्रकात शंभर (१००) कोटीची आर्थिक तरतूद* करण्याचे विचाराधीन आहे.

३) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ* करिता *अंदाज-प्रत्रकातील प्रस्तावित १०० कोटीची आर्थिक तरतूद* इतर आर्थिक विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आली होती, परंतु संबंधित आर्थिक विकास महामंडळाकडून खर्च न झाल्याने निधी वाया गेला. *मात्र या आर्थिक वर्षात पुन्हा अशी गलत होणार नाही, याबद्दल सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाईल*. असे मा मंत्री महोदयांनी शिष्टमंडळाला सांगितले.

४) बलुतेदारांच्या पाल्यांना *उच्च शिक्षणांतर्गत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील* राखीव १९% राखीव कोट्यातील *स्वतंत्र ४% जागा राखीव* ठेवण्याची तरतूद केली जाईल, असे आश्वासन देखील दिले.

५) करोना काळात *आर्थिक कारणास्तव आत्महत्या* केलेल्या बारा बलुतेदार समाज बांधवांच्या कुटुंबियांना *शासनाकडून चार लाखांपर्यंत आर्थिक मदतीची* तरतूद केली जाईल, असे आश्वासित केले.

६) *बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाच्या* शासनाकडून दरवर्षी होणाऱ्या *आर्थिक तरतुदीपैकी ७०% निधी ग्रामीण भागातील लोकांना व ३०% निघी शहरी भागातील* लोकांसाठी तरतूद प्रस्तावित केली जाईल, असे देखील सांगितले.
वरिल मागण्या प्रमाणेच इतर मागण्यांवर देखील मा.मंत्री महोदयांशी गांभीर्याने चर्चा करण्यात आली.