राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.


राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित रक्तदान शिबिर संपन्न.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
संपूर्ण राज्यात कोविड १९ च्या दुसऱ्या लाटे मुळे मोठ्या प्रमाणात रुगणांची संख्या वाढली असून प्रचंड प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
एका अर्थाने राज्यावर आलेल्या संकटा समयी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आव्हान राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व्हेसर्वा
आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. महेबूबभाई शेख यांनी आव्हान केले. रक्तदाना संबंधाने केलेल्या आव्हाना नुसार आज वरोरा नाका चंद्रपूर येथील पत्रकार भवन येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात ५० हुन अधिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.सदर कार्यक्रमात शहर अध्यक्ष राजीव भैय्या कक्कड, ओ. बि. सी. सेल चे प्रदेश सरचिटणीस सुरेश रामगुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनिल भाऊ काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर सर, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, रा.वि.काँ. जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, शहर अध्यक्ष राम इंगळे, महिला अध्यक्षा ज्योतीताई रंगारी, कार्याध्यक्षा चारुशीला ताई बारसागडे, युवती अध्यक्ष प्रज्ञा पाटील, मीडिया जिल्हाध्यक्ष नितीन पिंपलशेंडे, दीपक भाऊ गोरडवार, शहर उपाध्यक्ष सतीश मांडवकर, कामगार जिल्हा उपाध्यक्ष संजय सेजुळे, मंगेश बारसागडे, राहुल भगत, आकाश निरटवार, अनुकूल खन्नाडे, अभिनव देशपांडे, यशवंत खडसे, राहुल देवतळे, राकेश आयडपवार, शुभम आंबोडकर, रोशन फुलझेले, निलेश आत्राम, प्रलय मशाखेत्री, कृष्णा झाडे, कुणाल ठेंगरे, कार्तिक निकोडे, अविनाश मांडवकर, पवन बंडीवर, पियुष भोगेकर, प्रेम परचाके, रोशन जुनघरे, कपिल उके, चेतन अनंतवार, राजू रेड्डी, प्रतीक भांडवलकर, राकेश रापेल्लीवार, सॅम चिलकेवार, भोजु शर्मा, आकाश बंडीवार,अक्षय सगदेव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.