विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर च्या वतीने ईरई नदी बचाओ आंदोलन





विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूर च्या वतीने ईरई नदी बचाओ आंदोलन

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
दिनांक 19 जून 2021 रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार माननीय श्री राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदार माननीय श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे ईरई नदीवर बंधारा झाला पाहिजे. याकरिता काँग्रेसचे युवा नेते श्री राहुल बाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली नदीच्या पात्रात ईरई नदी बचाव आंदोलन करण्यात आले,
ईरई नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात नदीपात्रात माती व गाळ साचला आहे. तसेच नदीपात्र सभोवताल झाडेझुडपे लागल्याने नदीच्या पात्रा ची खोली कमी झाली आहे. ईरई नदीचे खोलीकरण व साफसफाई न केल्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. या मागण्या पूर्ण करण्याकरिता विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे यापूर्वी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर 2 यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती.
परंतु दोन महिने झाल्यानंतर ही सुद्धा ईरई नदीच्या पात्राची साफसफाई केली नाही. तसेच खनिज विकास निधीतून ईरई नदीवर बंधारा बांधला तर चंद्रपूर शहराला पिण्याचे पाणी व जिल्ह्याला शेती सिंचना मूलभूत पाणी साठा उपलब्ध होईल. व चंद्रपूर शहरात अमृत योजना च्या नवीन 9 पाणी टाक्या निर्माण केले आहे. या टाक्या सुद्धा पाणी भरण्यासाठी हा बंधारा कामात येईल.
म्हणून ईरई नदीचे खोलीकरण, साफसफाई व बंधारा त्वरित निर्माण करावा या मागणीकरिता काँग्रेसचे युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष श्री गजानन गावंडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री देवेन्द्र बेले, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री करण पुगलिया, नगरसेवक श्री अशोक नागापुरे, इंटकचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर पोडे, माजी नगरसेवक श्री विनोद पिंपळशेंडे, काँग्रेसचे रतन शीलावार, श्री रामदास वागदारकर, वीरेंद्र आर्या, अनिल तुंगीडवार, सुधाकरसिंह गौर,असलम भाई,दुर्गेश चौबे, राजू लहामगे अनंता हुड, सुनील बावणे, बाबूलाल करुणाकर, सुनील बकाली, असंख्य काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला