सचिन भोयर नगरसेवक मनपा यांनी चंद्रपूरकरांचा आवाज बुलंद करून, केली पोल खोल!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
२९/०७/२०२१ रोजी चंद्रपूर महानगर पालिकेत आमसभा पार पडली त्यात चंद्रपूर महानगर पालिका परिसरात राबविण्यात येणाऱ्या अमृत योजनेचा धिंगाना प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दाखवून दिला. सचिन भोयर यांनी स्वतःच्या अंगावर चिखल घेऊन आमसभेत प्रवेश करुन जे प्रदर्शन केले व जी मागणी केली ती अगदी रास्त आहे.
या मुळे मनपात होत असलेल्या कामाची पोलखोल झाली. एवढेच नव्हे तर सत्ताधारी लोकांची तारांबळ उडाली व क्षणातच गोंधळ झाला. कारण सचिन भोयर यांच्या समर्थनार्थ इतर सर्व पक्ष व नगरसेवक आमसभेत दाखल झाले. म्हणून विद्यमान महापौर आणी स्थाई समिती सभापती मुजोरी वर आले. परिणामी सभागृहात अनेक मुद्दे उपस्थित झाल्याने विद्यमान सभापति दादागिरी करू लागले . मंचाच्या खाली उतरून नगरसेवकाच्या अंगावर धावून जाण्याचे अश्लील शिवीगाळ करण्याचे अशोभनीय प्रकार करु लागले. जे की सर्रास चुकीचे आहे. सभागृहात पदस्थानी डायसवर असताना खाली उतरून राडा करणे कदापिही
झाले असेल, असे आज चंद्रपूर मनपात घडले.
विद्यमान सभापती व महापौर आपल्या पदाची गरिमा अबाधित न ठेवता जर अमृत योजनेच्या कंत्रादारांला पाठीशी घालत असेल तर *"कुछ तो दाल मे काला हैं! असा संशय येतो. म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर ही सभापती पदासाठी आग्रही असणाऱ्या रवि आसवानीची तात्काळ हकालपट्टी व्हावी व हेतूुपुरस्सर टोलवाटोलवी करुन सभापती पदाची निवडणूक न होऊ देणाऱ्या महापौर, सभापती व आयुक्त यांच्या विरुद्ध नुसता नगरसेवकच नाहीतर चंद्रपूरकरांचा ही आवाज बुलंद होतो आहे.
मनपात होत असलेल्या सडक्या राजकारणाची वाच्यता शहरात होत आहे.
त्यामुळे ह्या विषयावर सर्व पक्षीय गटनेते यांची प्रतिक्रिया घेतली असता असे लक्षात आले की, विद्यमान पदाधिकारी व प्रशासन संगनमताने पालिका निती धाब्यावर मांडून पालिकेचे सर्रास व्यापारीकरण करीत आहे. जे की लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. व चिंता ही व्यक्त केली जात आहे. की, सत्ताधारी लोकं मुजोरी यासाठी करीत आहे कारण पालिका प्रशासन महापौर यांच्या हातचे बाहुले झाले आहे.
काल सर्वसाधारण आमसभेत झालेला प्रकार हा प्रशासनाच्या व सत्ताधाराच्या निष्काळजीपणाने घडला आहे. म्हणून मनपाचा कारभार सुरळीत व्वा म्हणून सर्व पक्षीय गटनेते तात्काळ सभापती पदाची निवडणूक घेण्यासाठी आग्रही आहेत .
दिनचर्या न्युज