महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीच्या पदासाठी भाजपात रणकंद !





महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीच्या पदासाठी भाजपात रणकंद !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पदासाठी, झालेल्या आमसभेत नवीन 8 स्थायी समिती सदस्याची निवड केली जाणार आहे. मात्र यासाठी भाजपात नवीन स्थायी समिती सदस्य साठी रणकंदन सुरू झाले आहे. आपले नाव सदस्य यादीत यावे यासाठी वरिष्ठांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सोमवारी स्थायी समितीची ऑनलाइन सभा घेण्यात आली. या सभेत सर्वांचे लक्ष स्थायी समिती सदस्याच्या निवृत्तीच्या विषयाकडे होते. या समितीतील भाजपाचे सदस्य विद्यमान सभापती रवी आसवानी, संजय कंचलावार, सुभाष कासनगोटुवार , बसपाचे गटनेते अनिल रामटेके, प्रदीप डे, काँग्रेसच्या विना खनके, सकिना अन्सारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला आखरे यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यात मनपातील भाजपचे गटनेते वसंत देशमुख मागील स्थायी समितीच्या निवडणुकीपासून भाजपमधील अंतर्गत कलह आणी दरी अजूनही संपली असे चित्र सध्यातरी दिसून येत नाही. स्थायी समितीच्या नवीन सदस्या साठी वर्णी लागावी म्हणून भाजपचे संदीप  आवारी, श्याम कनकम, प्रदीप किरमे , यांचे नाव यादीत यावे यासाठी वरिष्ठांकडून  खासकरून भाजपचे जिल्हाध्यक्ष याच्या कडून भाजपचे गटनेते असलेले वसंत देशमुख यांची विनवनी सुरू असल्याची खमंग चर्चा सध्या सुरू आहे. 
मात्र या नावांना वसंत देशमुख यांचा मोठा विरोध असल्याची सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. या खेळीमुळे पुन्हा एकदा भाजपात कुरघोडी होणार की, काय! या संशयाने राजकारण तापल्या जात आहे. आता होणाऱ्या आमसभेत यावर विषयावर पळदापास होणार की, नाही!  कोणाच्या गळ्यात सभापती पदासाठी माळ पळेल? 
म्हणून म्हणावे लागेल की, ही सत्ता स्थापनेची खेळी नेमकी कुणासाठी व कशी रंगणार हे पाहण्यासारखे होईल! 
         

  !