जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कामांचा लेखाजोखा काय?





जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कामांचा लेखाजोखा काय?

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :- जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे सर्व सामान्यांना काम पडणाऱ्या कार्यालया पैकी एक कार्यालय म्हणजे तालुक्यातील तहसील कार्यालय, त्याच विभागातील ग्रामीण भागात काम करणारे तलाठी कार्यालय या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामांचा लेखाजोखा काय? हे सर्व सामान्यांना माहिती नसल्याने व ते आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर फलक न लावल्याने सर्व सामान्य माणसाच्या अडचणी निर्माण होत आहेत.
तालुक्यातील महसूल अधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी यांच्या बदल्या झाल्या तरी फक्त गाव साझा बदलून घेताना दिसत. मात्र मुख्यालय जैसे थे! अनेक तलाठ्यानी आपल्या कार्यालयात खाजगी कर्मचारी ठेवून शासकीय कामकाज करून घेतात. मुख्यालयी असलेल्यांचे कारण दाखवून महिना महिना सांझाकडे फिरकत नसल्याचे दिसून येते.
महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी, कर्मचारी हे शासकीय कामांकडे लक्ष न देता शेतीसंबंधित, रेती माफीया या दलाली धंदामध्ये भरकटलेले आहेत. कार्यालयात किती वेळ काम करतात हे यांच्या खाली असलेल्या खुर्ची वरून जनतेला कळून येत आहे. 
कोरोना काळात अनेक कर्मचारी, अधिकारी यांनी आपल्या कामात दुर्लक्ष करून कोरोनाचे कारण दाखवून गावखेड्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून घेतल्याचे अनेक गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.