चंद्रपूर महानगर पालिका कोणाची कठपुतली तर नाही ना?

चंद्रपूर महानगर पालिका कोणाची कठपुतली तर नाही ना?


चंद्रपूर महानगर पालिका चालविणारा सूत्रधार कोण?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज दिनांक 31/08/2021 रोजी चंद्रपूर महानगर पालिकेची सर्वसाधारण (आमसभा) पार पडली. सर्वांना अपेक्षा होतीच की ही आमसभा वादग्रस्त होईल. म्हणून आधीच कडक निर्बंध घातले गेले होते. पण त्यात चूक अशी झाली की,आमसभा जरी ऑनलाईन असली तरी सर्व पक्षीय गटनेत्याना प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी होती. इतर नगरसेवक मात्र ऑनलाईन पद्धतीने आमसभेत सहभाग दर्शवू शकतात असे हे धोरण असताना हेतुपुरस्सर गटनेते पप्पूभाऊ देशमुख यांना का बरे नाही सभागृहातच नव्हे तर महानगरपालिकेत सुद्धा येऊ दिले नाही हे समजण्या पलिकडे आहे. दुसरे असे की असाच काहीसा प्रकार बसपा गटनेते अनिल रामटेके यांच्या विरूद्ध झाला. अनिल रामटेके यांनी आत्मदहन करण्याचा विषय घेतला असल्यामुळे त्यांना प्रशासनाने अडविणे स्वाभाविक होते पण अनिल रामटेके यांनी आत्मदहन माघे घेतल्याची माहिती त्यांनी आधीच जाहीर केली होती. म्हणून भाजपचे गटनेते यांनी मध्यस्थी केली व त्यांना महानगर पालिकेत प्रवेश मिळाला आणी रामटेके यांना आमसभेत हजेरी लावता आली. पण पप्पू देशमुख प्रती मनपा प्रशासन तथा विद्यमान महापौर का म्हणून उदासीन होत्या म्हणून पप्पू देशमुख यांना कडक बंदोबस्तात मज्जाव करण्यात आला ? हा प्रश्न आयुक्त आणी महापौर विचारल्या गेला पाहिजे. कारण सर्व पक्षाचे गटनेते आमसभेत हजेरी लावत असताना पप्पू देशमुख यांनाच मज्जाव का?
काही प्रमाणात चर्चा अशी ही आहे की, हा मज्जाव खऱ्या अर्थाने भाजप गटनेते वसंत देशमुख यांच्या साठी होता परंतु वसंत देशमुख यांचा चाहता वर्ग इतका आहे की, त्यांना मज्जाव करण्यासाठी नेमलेल्या व्यवस्थेने त्यांना आदर पूर्वक सन्मानासह प्रवेश दिला व पप्पू देशमुख यांना मज्जाव करुन देशमुख यांना मज्जाव केल्याचा पावित्रा आखला.
परंतु पप्पू देशमुख यांनी रितसर चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन इथे रितसर तक्रार केली व त्यानंतर महानगर पालिकेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केला. त्याच दरम्यान काँग्रेसच्या वतीने सुध्दा आंदोलन झाले. व त्यांना ही महानगर पालिकेत अटकाव झाला तथा बऱ्याच पत्रकारांना सुध्दा प्रवेश नाकारला.एकंदरीत आमसभा बैठक इथे अनेक विषयावर खडाजंगी पेटली असताना महानगर पालिका मुख्य प्रवेश दारासमोर जो मज्जाव करण्याचा प्रकार चालला दिसला त्यातून हे स्पष्ट होते की, महापौर व आयुक्त यांची मनमानी सर्रास वचक बनून चंद्रपूर महानगर पालिकेवर गाजावाजा करीत आहे.ऐवढेच नाहीत तर, आता चंद्रपूरची जनता विचात आहे की, महानगरपालिका हि कोणाची कठपुतली तर नाही ना?
अशा सर्व परिस्थितीत आमसभेत भाजप गटनेते वसंत देशमुख यांनी स्थायी समिती तथा प्रशासनावर बोट ठेवणारे विषय उचलून सभागृहाला घाम फोडल्याने आयुक्त तथा महापौर निरुत्तर झाल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत असल्याने स्पष्ट होते की निश्चित चंद्रपूर महानगरपालिकेत आयुक्त व महापौर हे संगनमताने आपले नाते जोपासत आहे. म्हणून गटनेता असो वा नगरसेवक किंवा जनता असो वा पत्रकार कुणाचेही काही ऐकून घेतल्या जात नाही. याचा अर्थ असा की, निश्चित कुठले तरी स्रोत पडद्या मागे असले पाहिजे व तसे कारणही हे अगदीं स्पष्ट आहे. येणारा काळात कुठले दिवस चंद्रपूरकराना बघावयास मिळेल हे बघण्यासारखे होईल.