माजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट?

माजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट?

या. मथळ्याखाली बातमी प्रसारीत करण्यात आली होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी आणि हंसराज अहीर यांची भेट मुंबई व नागपूर येथे होत असतात. पण संघटना चर्चा, विरोधाच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. हि बातमी वजिन चुकीची आहे. खोडसाळ आहे. असे फोनवरून संपर्क साधून केले. पक्ष संघटना चंद्रपूर येथील पदाधिका-यांशी चर्चा करावी असे सोशल मीडियावर असल्याने तो शहरात चर्चेचा विषय होत असल्याने ती बातमी प्रसारीत करण्यात आली होती. 

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

विद्यमान परिस्थितीत चंद्रपूर महानगर पालिका चंद्रपूरातील सभापती पदासाठी चाललेली घोडदौड रोज रोज वेगवेगळे प्रकरण वाचायला मिळत असतानाच माजी खासदार मा.हंसराज अहिर हे आपल्या फेसबुक वरून माजी मुख्यमंत्री ते विद्यमान विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार हंसराज अहीर यांनी जिल्ह्यातील भाजप कल्लोळा बाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट का, व कशासाठी घ्यावी लागली. ही जिल्ह्यात होत असलेल्या भाजपच्या कुरघोडी, एकतर्फी राजकारण, भविष्यात जिल्ह्यातील भाजपच्या संघटनांवर येणारी दुफळी, मनपाच्या निवडणूकवर होणारे बदल यावर होणारे परिणाम यासाठी भेट घेतल्याची व चंद्रपूरच्या भाजप संघटनेची चर्चा केल्याची पोस्ट करतात याचा अर्थ समजण्या पलिकडे जरी असला तरी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती अशी की, कुठेतरी एक मुखी भाजपचे सर्वेसर्वा बनून ज्या पद्धतीने पक्षाचा जो काही एक हाती कारबार चालविलेला आहे. तो हंसराज अहिर यांना पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पचनी पडत नसावा म्हणून त्यांना मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या चंद्रपूर येथील राजकारणा विषयी चर्चा करावी लागली व अशी विनंती करावी लागली की,"चंद्रपूरचे स्थानिक पातळीवरचे भाजपचे राजकारण काही योग्य नाही तेंव्हा तुम्हीं तरी हस्तक्षेप करून कार्यकर्ता बैठक घ्या. जेणेकरून अटल बिहारी वाजपेयी यांची विचारधारा घेऊन वाढलेला पक्ष विद्यमान परिस्थितीत चंद्रपुरातील व्यापारीकरणातून बाजूला सारल्या जाईल व अटल विचारांनी पक्षनिष्ठ होऊन पूर्ववत होईल.
ही बैठक मुंबई इथे पार पडल्याचे समजते त्यामूळे निश्चित म्हणावे लागेल की, अति महत्त्वाकांक्षी धोरणामुळे हंसराज अहिर यांना हे पाऊल नाईलाजास्तव उचलावे लागलें असे समजले जात असले तरी . यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यां व नेत्यात संभम निर्माण झाला आहे.