जिल्ह्यातील ३ विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार - रो.ह.यो.समितीचे अध्यक्ष आ.मनोहर चंद्रिकापुरे व आ.अमोल मिटकरी यांचं बल्लारपूरात आश्वासन!





बल्लारपूर शहरातील शेकडो सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश

जिल्ह्यातील ३ विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार - रो.ह.यो.समितीचे अध्यक्ष आ.मनोहर चंद्रिकापुरे व आ.अमोल मिटकरी यांचं बल्लारपूरात आश्वासन!
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे बल्लारपूर येथील कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बल्लारपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात. बल्लारपूरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची हीच तत्परता बघून तालुक्यातील समाजकार्य करणाऱ्या युवकवर्गामध्ये मोठ्या संख्येनेे स्वतःहुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करण्याची ओढ लागली आहे.
   याच अनुषंगाने आज बल्लारपूर येथे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक आ.श्री.मनोहरराव चंद्रिकापुरे व राष्ट्रवादी पक्षाची मुलुख मैदानी तोफ आ.श्री.अमोल मिटकरी तसेच जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य,महिला अध्यक्षा सौ.बेबीताई उईके,ज्येष्ठ नेते श्री.हिराचंद बोरकुटे,श्री.प्रियदर्शन इंगळे,श्री.मेहमूद मुसा,बल्लारपूर शहर अध्यक्ष श्री बादल उराडे,शहर कार्याध्यक्ष श्री.राकेश सोमाणी,तालुका अध्यक्ष श्री.महादेव देवतळे,श्री.रोहन जामदडे,अर्चना बुटले, शहजादी अन्सारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत,जिलाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष बादल भाऊ उराडे, कार्याध्यक्ष इंजि. राकेश सोमानी यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहरातील दोन प्रमुख युवा नेत्यांनी ज्यात जितेश नंदकुमार पिल्ले व रवी बेज्जला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र वैद्य यांनी २०१९ च्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला एकही विधानसभेची जागा न मिळाल्याची खंत व्यक्त केली,




आणि त्यामुळे २०२४ विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या ३ जागांवर काँग्रेस पक्ष सतत पराभूत होत आहे त्या जिल्ह्यातील बल्लारपूर, चिमूर व चंद्रपूर या जिल्ह्यातील ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला घेण्याबाबत रोक ठोक भूमिका मांडली व त्यादृष्टीने जिल्ह्यात पुढील काळात होवू घातलेल्या  जि.प./पं.स./न.प./ या निवडणुकांची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय गांभीर्याने घेतली व तशी तयारी सुद्धा पक्षाने सुरू केल्याबाबतची माहिती दिली. जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक मा.आ.मनोहर चंद्रिकापुरे व आ.अमोलदादा मिटकरी यांनी पुढील विधानसभेत जिल्ह्यातील निम्म्या जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल व त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी या तिन्ही मतदार संघात कामाला लागण्याचे आवाहन केले,आगामी जि.प./पं.स./न.प./ महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्याचे आवाहन सुद्धा या उभयतांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष आरिफ खान,संजय गांधी निराधार योजना सदस्य सुमित(गोलू)डोहणे ,अंकीत निवलकर, देवा यादव, नासिर बक्ष,सौ अर्चनाताई आलाम, शेखलाल शेख, रणजित ठाकूर,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष महादेव देवतळे यांनी केले.

दिनचर्या न्युज